शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कॉल ड्रॉप करून पैसे उकळण्याची शक्कल!

By admin | Updated: April 22, 2015 00:48 IST

मोबाईलवर बोलणे सुरू असताना मध्येच कॉल ड्रॉप होतो. मग पुन्हा तो लावला जातो.. काही सेकंदानंतर पुन्हा ड्रॉप होतो. मग कॉल पुढच्या व्यक्तीकडून ‘कट’ झाल्याचा

रघुनाथ पांडे,  नवी दिल्ली -मोबाईलवर बोलणे सुरू असताना मध्येच कॉल ड्रॉप होतो. मग पुन्हा तो लावला जातो.. काही सेकंदानंतर पुन्हा ड्रॉप होतो. मग कॉल पुढच्या व्यक्तीकडून ‘कट’ झाल्याचा सरसकट आरोप करत पुन्हा करून बोलणे सुरू ठेवतो.. साधारणत: मिनिटभरात असे तीन-चारदा घडते. असे घडले की समजावे एक मिनिटाच्या आपल्या मोबाईल बिलात आता चार मिनिटांचे पैसे लागणार आहेत. वरवर पाहता हा कॉल ड्रॉप होण्याचा प्रकार दिसत असला तरी मोबाईल कंपन्याची पैसे उकळण्याची नवी शक्कल असल्याची गंभीर तक्रार महाराष्ट्रातील पाच खासदारांनी केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांकडे पुराव्यासह केली आहे. मोबाईल कंपन्या ग्राहकांची ग्राहकांची अशी फसवणूक करत आरोप झाल्याने केंद्राने हा मामला गंभीरपणे घेतला असल्याचे खासदारांनी सांगितले. दीड- दोन महिन्यांपासून मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर, औरंगाबादसह देशातील काही शहरात मोबाईलसेवेचे कॉल ड्रॉप होण्याचे त्रांगडे झाले आहे. वारंवार होणारा हा प्रकार ग्राहकाच्या माथी केवळ मनस्तापच देतो. पण असे का होते, याचा शोध खासदारांनी घेतल्याने कोट्यवधी रूपये कमविण्याचा हा धंदा असल्याचे पुढे आले आहे. मोबाईलवर बोलताना सारखे कॉल ड्रॉप होत असल्याने त्रस्त खासदारांनी प्रथम मोबाईल कंपन्यांकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा नेटवर्कच्या समस्येमुळे असे घडत असावे असे सांगण्यात आले.हा नवीन उपदव्याप केंद्राच्या दूरसंचार स्थायी समितीचे सदस्य खा. सुनील गायकवाड, खा. गोपाळ शेट्टी, खा. रामदास तडस, अ‍ॅड. चिंतामण वनगा यांनी रविशंकर प्रसाद यांना लेखी तक्रारीतून कळविला.