शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग, आधी भाऊ-बहीण, मग वडिलांनी मारली उडी, तिघांचाही मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:52 IST

Fire In Delhi News: दिल्लीतील द्वारका परिसरात एका बहुमजली इमारतीला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीच्या विळख्यात काही कुटुंबं सापडली. दरम्यान, आगीपासून बचाव करण्यासाठी एका कुटुंबातील काही जणांनी वरून खाली उड्या मारल्या. यात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

दिल्लीतील द्वारका परिसरात एका बहुमजली इमारतीला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीच्या विळख्यात काही कुटुंबं सापडली. दरम्यान, आगीपासून बचाव करण्यासाठी एका कुटुंबातील काही जणांनी वरून खाली उड्या मारल्या. यात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने या आगीबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका सेक्टर-१३ मधील एका इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या आठ वाहनांनी आग शमवण्याचं काम सुरू केलं. मात्र ही आग एवढी भयानक होती की, त्यामध्ये संपूर्ण इमारत वेढली गेली.

या आगीच्या विळख्यात सापडल्याचं पाहिल्यानंतर सातव्या मजल्यावर राहणारं एक कुटुंब घाबरलं. या कुटुंबातील भाऊ-बहीण आणि वडिलांनी सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यश यादव असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव आहे. ते पेशाने व्यावसायिक होते. या आगीमधून यश  यादव यांची पत्नी आणि मोठा मुलगा मात्र सुदैवाने बचावले. त्यांना अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

टॅग्स :fireआगdelhiदिल्लीAccidentअपघात