शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

Manikarnika Ghat: मणिकर्णिका घाटावर बुलडोजर; दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा, कारण ठरले 'ते' फोटो, व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 20:43 IST

Manikarnika Ghat Demolition Latest Update: मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पाडापाडीचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. त्यानंतर संतापाची लाट उसळली असून, काही व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणी दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Manikarnika Ghat Demolition News: वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी काही ठिकाणी पाडकाम करण्यात आले असून, त्यावरून राजकारण तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. यातील काही फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले गेले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. हेच फोटो व्हायरल करून समाजात भ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाराणसी पोलिसांनी मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाबद्दल सोशल मीडियावर एआय फोटो, व्हिडीओ आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह आणि काँग्रेसचे खासदार पप्पू यादव यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी काय सांगितले?

आठ लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त गौरव बन्सल यांनी सांगितले की, "मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरण आणि स्मशान सुविधा वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याबद्दल दिशाभूल करणारी माहिती, फोटो आणि व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी ८ व्यक्ती आणि काही एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे", बन्सल यांनी सांगितले. 

गुन्हा दाखल होताच संजय सिंह भडकले

वाराणसी पोलीस ठाण्यात शनिवारी या प्रकरणी एफआरआय दाखल केली गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर खासदार संजय सिंह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघाती मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मंदिरे तोडली गेली आहेत. काशी विश्वेश्वरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तोडण्यात आली. त्याचा साधुसंतांनी वाराणसीमध्ये विरोध केला."

"अहिल्यादेवी होळकर यांच्या वारसदारांनीही याचा विरोध केला आहे. इतकंच काय तर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही याला विरोध केला आहे. पण, माझ्याविरोधात एफआरआय दाखल कऱण्यात आला आहे. मंदिर तोडणाऱ्या पापी लोकांवर कारवाई करा. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका", असा संताप खासदार संजय सिंह यांनी व्यक्त केला.

धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न

सहायक पोलीस आयुक्त अतुल अंजान त्रिपाठी म्हणाले, "खासदार संजय सिंह, खासदार पप्पू यादव यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पाडकामाबद्दल एक एआय व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवण्यात आला. त्यात चुकीच्या पद्धतीने माहिती दिली गेली आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Manikarnika Ghat demolition: FIR against MPs for sharing misleading content.

Web Summary : Controversy erupts over Manikarnika Ghat redevelopment in Varanasi. Police filed FIR against MPs Sanjay Singh, Pappu Yadav, and others for spreading misleading AI-generated content regarding demolition, inciting religious sentiments.
टॅग्स :VaranasiवाराणसीReligious Placesधार्मिक स्थळे