शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:00 IST

Mahakumbh Stampede : महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Mahakumbh Stampede : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता याप्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांनी आपली चूक मान्य केली आहे. खुद्द उत्तर प्रदेशचे पोलीस प्रमुख डीजीपी प्रशांत कुमार यांनी ही चूक मान्य केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले की, आम्ही या चुकीपासून खूप काही शिकलो आणि चांगल्याप्रकारे गर्दी हाताळण्याचे काम केले. 

माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत डीजीपी प्रशांत कुमार माध्यमांशी बोलत होते. हे पाचवे स्नान असून आता महाशिवरात्रीचे स्नान बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. मौनी अमावस्येच्या दिवशी गर्दी व्यवस्थापनात एक छोटीशी चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला. त्या घटनेपासून धडा घेत उत्तर प्रदेश पोलीस अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी काम करत आहे. मौनी अमावस्येनंतरही दररोज करोडो लोक येथे येत आहेत, मात्र आता कुठेही अडचण आली नसल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे दररोज कोट्यवधी भाविक संगमात सुरक्षितरित्या स्नान करत आहेत. आतापर्यंत 46 ते 47 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. माघी पौर्णिमेनिमित्तही कोट्यवधी लोकांनी स्नान केले. महाकुंभाव्यतिरिक्त, गर्दी व्यवस्थापनाची पद्धत चित्रकूट, काशी विश्वनाथ मंदिर, विंध्याचलमधील विंधवासिनी मंदिर, अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरातही अवलंबण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लखनौमध्ये वॉर रूम डीजीपी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व मंदिरांमध्ये होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी राजधानी लखनऊमध्ये एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. या वॉर रूममधूनच ठिकठिकाणी गर्दीची परिस्थिती आणि व्यवस्थापनाच्या पद्धती पाहिल्या जात आहेत. एकट्या महाकुंभात 2500 हून अधिक हाय रिझोल्युशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांमधून थेट फीड घेण्यात येत आहे. इतर मंदिरांमध्येही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस