LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:45 IST2026-03-13T11:45:26+5:302026-03-13T11:45:43+5:30

LPG Cylinder Booking New Rules 2026: LPG सिलेंडरच्या तुटवड्याच्या अफवेमुळे लोकांची साठवणुकीसाठी लगबग सुरू आहे. तेल कंपन्यांनी बुकिंगचे नियम बदलले असून ग्रामीण भागात आता ४५ दिवसांचे अंतर अनिवार्य आहे. वाचा सविस्तर.

LPG cylinder booking rules changed 3 times in 6 days; Now booking can be done only after 45 days in the village... | LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार...

LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार...

देशात सध्या घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. वाढती मागणी आणि लोकांमध्ये पसरलेल्या अफवा लक्षात घेता, तेल कंपन्यांनी गेल्या सहा दिवसांत तब्बल तीन वेळा सिलेंडर बुकिंगच्या नियमांत बदल केले आहेत. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत नवीन नियम?
१. ६ मार्च: घरगुती गॅस बुकिंगसाठी २१ दिवसांचा लॉक-इन पिरियड लागू करण्यात आला.
२. ९ मार्च: मागणीत अचानक वाढ झाल्याने शहरांमधील हा कालावधी वाढवून २५ दिवस करण्यात आला.
३. १२ मार्च: ग्रामीण भागात सिलेंडर पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी दोन बुकिंगमधील अंतर २० दिवसांवरून थेट ४५ दिवस करण्यात आले आहे.

५५ दिवसांऐवजी १५ दिवसांतच बुकिंग!
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात सरासरी ५५ दिवसांनी सिलेंडर बुक करणारे ग्राहक आता अफवांमुळे अवघ्या १५-१५ दिवसांच्या अंतराने बुकिंग करत आहेत. गरजेपेक्षा जास्त साठा करण्याच्या या प्रवृत्तीमुळे गॅस वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.

इंडक्शन विक्रीत विक्रमी वाढ; साठा संपला!
गॅसच्या टंचाईमुळे लोकांनी आता इलेक्ट्रिक इंडक्शन कुकटॉपकडे मोर्चा वळवला आहे. ॲमेझॉनवर सामान्यतः एका महिन्यात १.८० लाख इंडक्शन विकले जातात, मात्र आता एकाच दिवसात १.३४ लाख इंडक्शनची विक्री झाली आहे. गेल्या ४ दिवसांत एकूण ५ लाख इंडक्शनची विक्री झाली असून, १०० पैकी ७० कंपन्यांचा स्टॉक संपला आहे. अनेक ठिकाणी इंडक्शनच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.

मध्य प्रदेशात ऑनलाईन बुकिंग ठप्प
मध्य प्रदेशात सर्वर डाऊन असल्याने एलपीजीची ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली आहे. भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर यांसारख्या मोठ्या शहरांत गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वेटिंग पिरियड ७ ते ८ दिवसांवर पोहोचला असून, ५० हजार हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये गॅस संपण्याच्या मार्गावर आहे.

Web Title : एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम 6 दिनों में तीन बार बदले!

Web Summary : एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम मांग और अफवाहों के कारण तीन बार बदले गए। ग्रामीण क्षेत्रों में अब बुकिंग के बीच 45 दिनों का अंतर है। इंडक्शन कुकर की बिक्री बढ़ी, जिससे स्टॉक खत्म हो गया और कीमतें बढ़ गईं। मध्य प्रदेश में ऑनलाइन बुकिंग बाधित और गैस की कमी है।

Web Title : LPG Cylinder Booking Rules Changed Thrice in 6 Days!

Web Summary : LPG cylinder booking rules have changed thrice recently due to increased demand and rumors. Rural areas now face a 45-day gap between bookings. Induction cooker sales surged, causing stock depletion and price hikes. Madhya Pradesh faces online booking disruptions and gas shortages.