धक्कादायक! घरातला सिलिंडर संपला, रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:44 IST2026-03-14T14:43:50+5:302026-03-14T14:44:44+5:30
कोतवाली परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सीजवळ सकाळी रांगेत उभे असलेले ७५ वर्षीय मुख्तार अंसारी अचानक बेशुद्ध होऊन पडले.

धक्कादायक! घरातला सिलिंडर संपला, रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कोतवाली परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सीजवळ सकाळी रांगेत उभे असलेले ७५ वर्षीय मुख्तार अंसारी अचानक बेशुद्ध होऊन पडले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ त्यांना सीपीआर (CPR) देऊन आणि हार्ट पंपिंग करून वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार अंसारी यांनी आधीच गॅस सिलिंडर बुक केला होता आणि त्यासाठी ते सकाळी साडेसहाच्या सुमारास एजन्सीमध्ये गेले होते. रांगेत उभे असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. उपस्थित लोकांनी माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
#WATCH | Ballia, UP | People wait in line outside a gas agency to get LPG cylinders. pic.twitter.com/XLxUXcYxoG
— ANI (@ANI) March 12, 2026
सकाळपासून उभे होते रांगेत
घरात जेवण बनवण्यासाठी असलेला सिलिंडर संपला होता, त्यामुळे ते स्वतः सकाळी रांगेत उभे राहण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांची प्रकृती खालावली. यापूर्वी कधीही सिलिंडरची एवढी टंचाई भासली नव्हती, पण आता बुकिंग करूनही चकरा माराव्या लागत आहेत असंही कुटुंबीयांनी सांगितलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पंजाबमध्ये एका वृद्धाचा मृत्यू
पंजाबमधील बरनाला येथे रांगेत उभे असलेले ६६ वर्षीय भूषण कुमार मित्तल यांचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. आता सिलिंडरची टंचाई देशभर गंभीर रूप धारण करत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. बहुतांश ठिकाणी स्थानिक प्रशासन परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत असले, तरी सिलिंडर पुरवठ्याची जी परिस्थिती समोर येत आहेत, ती पाहता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.