शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:56 IST

Jharkhand News: काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हेमंत सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हेमंत सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय झारखंड मुक्ती मोर्चा आणि इंडिया आघाडीच्या आमदारांनी घेतला आहे. त्यानुसार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी हेमंत सोरेन हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

हेमंत सोरेन यांना काही महिन्यांपूर्वी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, नुकताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली आहे.

हेमंत सोरेन हे तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते झारखंडचे तेरावे मुख्यमंत्री असतील. १५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारचे विभाजन करून झारखंड या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधानसभेतील आमदारांच्या दलाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. हेमंत सोरेन यांनी ३१ मे रोजी अटकेची कारवाई होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  

झारखंडच्या राजभवनाकडून हेमंत सोरेन यांना भेटीसाठी ७.३० ही वेळ देण्यात आली होती. त्यानुसार हेमंत सोरेन आणि चंपई सोरेन हे राजभवनात दाखल झाले आहेत. तिथे हेमंत सोरेन नवे सरकार स्थापन करण्याचा दावा सागर करती. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना होईल.  

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी