शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

'कलम 370 हटविण्यासाठी गेली 70 वर्ष पक्षाने आंदोलन केलं मात्र तो निर्णय 48 तासात घेतला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 11:43 IST

राम माधव हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत.

जम्मू - कलम 370 हटविण्यासाठी गेली 70 वर्ष भारतीय जनता पार्टी आंदोलन करत होती. कलम 370 हटविल्याशिवाय जम्मू काश्मीरसह भारत हा अजेंडा पूर्ण होऊ शकत नव्हता. मात्र कणखर नेतृत्व देशाला मिळालं त्यामुळे कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला असं विधान भाजपाचे महासचिव राम माधव यांनी केला आहे. 

राम माधव हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी त्यांनी नवीन विधानसभेत अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी काही जागा आरक्षित असणार आहेत असं सांगितले. तसेच ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत एक विधेयक बनविले जाणार आहे. 31 ऑक्टोबरनंतर जम्मू काश्मीर काही काळासाठी केंद्रशासित राज्य असेल. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे संसदेत स्पष्ट केलं आहे की, जशी परिस्थिती सामान्य होईल जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. 

तसेच जम्मू काश्मीर विधानसभेचं पूनर्रचना केली जाईल. त्यात एकूण 114 जागा असतील. त्यातील 24 जागा पाकव्याप्त काश्मीरमधल्या असतील. या जागा सध्या खाली ठेवण्यात येणार आहेत. बाकी उर्वरित 90 जागा या जम्मू काश्मीरच्या असतील. भाजपा गेल्या 70 वर्षापासून कलम 370 हटविण्यासाठी आंदोलन करत होती मात्र 48 तासात हे कलम हटविले गेले असंही राम माधव यांनी सांगितले. 

दरम्यान जम्मू काश्मीरमधील काही घटक मानवाधिकारापासून वंचित आहे असं सांगत राम माधव यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा काढला. काश्मिरी पंडितांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवलं आहे. त्यांच्या अधिकाराची पुनर्व्यवस्था केली जाणार आहे असं राम माधव म्हणाले. गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाArticle 370कलम 370