शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 21:17 IST

Farmer Protest : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही केली घुसखोरी ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेतहे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही घुसखोरी केली असल्याचा दावा काँग्रेसचे लुधियानामधील खासदार रवनीत बिट्टू यांनी केला आहे. ज्यांची आंदोलने अपयशी ठकली आहेत ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेत, असा दावा बिट्टू यांनी केला आहे.रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जात आहे. हे कसलं पंजाब आहे. पंजाबमधील लोक असे करू शकत नाहीत. पंजाबमधील शेतकरी असं करू शकत नाही. ठोक देंगेसारखी भाषा पंजाबची नाही आहे. अशी भाषा बोलणारे असामाजिक आहेत. पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू अशी भाषा शेतकरी करू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. 

लुधियानामधील खासदार असलेल्या रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितले की, शेतकरी शांततेने आंदोलनाला बसले आहेत. तीन महिने पंजाबमध्ये आंदोलन सुरू असताना काही झाले नाही. पंजाब सरकारने हे आंदोलन शांततेने व्हावे, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच ते पन्नास हजार जण आहेत. हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आता नेत्यांनी पुढे येऊन यावर नियंत्रण नियंत्रण मिळवले पाहिजे कारण अनेक जण हे आंदोलन अपयशी करण्याच्या प्रयत्नात आहेत.हे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात. शेतकऱ्यांनाही तसेच वाटते. शेतकऱ्यांना ना कृषिमंत्र्यांवर विश्वास आहे. ना अन्य कुणावर, असेही बिट्टू यांनी सांगितले.रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे युवा नेते आहे. ते लुधियाना येथील खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसबा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. बेअंत सिंह यांची मुख्यमंत्री असताना हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकारPunjabपंजाबcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा