शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 12:56 IST

सीआरपीएफचे दोन जवान शहीद; पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला वीरमरण

बारामुल्ला: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक अधिकारी आणि सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आलं.

सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पळ काढला. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याआधी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांचादेखील सहभाग होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. गंभीर इजा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय जम्मू काश्मीर पोलीस दलातील एका अधिकाऱ्यालादेखील दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत वीरमरण आलं. 

याआधी शुक्रवारीदेखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केलं. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या नौगाम बायपासजवळ दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आलं. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सातत्यानं जवान आणि पोलीस पथकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी बारामुल्लातल्या सोपोरमध्ये लष्कराच्या तुकडीवर हल्ला झाला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता.
 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी