इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 23:10 IST2025-06-13T23:10:09+5:302025-06-13T23:10:25+5:30

Israel vs Iran War: इस्रायली विमानांनी इराणची राजधानी तेहरानवरही हल्ले सुरु केले आहेत. यामुळे इराणने एअर डिफेन्स सिस्टीम सक्रीय केली आहे.

Israeli fighter jets enter Iran again; attacks begin, missiles fired from Yemen in response | इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली

इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली

इराणमधून मोठी बातमी येत आहे. इस्रायलने पुन्हा हवाई हल्ले सुरु केले आहेत. लढाऊ विमानांनी इराणच्या क्षेपणास्त्र लाँचर्स आणि ड्रोन तळांवर अनेक हल्ले केले आहेत, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. फोर्डो अण्वस्त्र तळांजवळ दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. तसेच तेहरानच्या दक्षिणेकडील पारचिन अण्वस्त्र तळावरही हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.

इस्रायली विमानांनी इराणची राजधानी तेहरानवरही हल्ले सुरु केले आहेत. यामुळे इराणने एअर डिफेन्स सिस्टीम सक्रीय केली आहे. या हल्ल्यानंतर येमेनहून इस्रायलवर एक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले आहे. जेरुसलेममध्ये सायरन वाजू लागले आहेत. 

इराणची राजधानी तेहरानमधील स्थानिकांनी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक मोठे स्फोट झाल्याची माहिती दिली आहे. तबरेझ शहरातूनही स्फोटांची माहिती येत आहे. इस्त्रायलने पहाटे २०० लढाऊ विमाने इराणमध्ये घुसविली होती. 

या हल्ल्यांनंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून माहिती दिली आहे. तसेच इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारताचे परराष्ट्र मंत्री  एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. 

Web Title: Israeli fighter jets enter Iran again; attacks begin, missiles fired from Yemen in response