शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 09:29 IST

एका आयआरएस अधिकाऱ्याने त्याच्या सहकारी आयआरएस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लखनौमध्ये एका आयआरएस अधिकाऱ्याने त्याच्या सहकारी आयआरएस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑफिसमध्येच तुफान राडा पाहायला मिळाला. जॉइंट कमिश्नर रँकच्या एका अधिकाऱ्याने IRS गौरव गर्ग यांच्या डोक्यावर ग्लास मारल्याचा आरोप आहे. गर्ग हे लखनौमध्ये आयकर विभागात असिस्टेंट कमिश्नर आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये बराच काळ वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. गौरव गर्ग यांच्या पत्नी रवीना त्यागी आहे. त्यागी या आयपीएस अधिकारी आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

हाणामारीत जखमी झालेल्या गौरव गर्ग यांना उपचारासाठी लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती आता बरी आहे. दोन्ही आयआरएस अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी का झाली याचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, याआधीही दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये अनेक वेळा वाद आणि बाचाबाची झाली आहे. आज हा वाद इतका वाढला की तो हाणामारीपर्यंत पोहोचला आणि नंतर हिंसक हल्ला झाला.

गौरव गर्ग हे २०१६ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी

यूपी पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. लखनौ सेंट्रल डीसीपी आशिष श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. गौरव गर्ग हे २०१६ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. जशी तक्रार मिळेल त्यानुसार कारवाई केली जाईल याआधी लखनौच्या आयकर विभागातही अशीच घटना घडली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावरून निशाणा साधला आहे. 

सुरू आहेत उपचार

२०१६ बॅचचे आयआरएस अधिकारी गौरव गर्ग यांच्यावर त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्याने हल्ला केला. आयआरएस गौरव गर्ग यांना उपचारासाठी लखनौ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्यांची गर्दी झाली. आयआरएस गौरव गर्ग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सरकारचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आयआरएस अधिकारी गौरव गर्ग यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी लखनऊ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी