शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्या : इंद्राणीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 05:19 IST

शीना बोरा हत्या : प्रकृतीचे कारण विशेष न्यायालयाला अमान्य

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सरकारी साक्षीदारांवर दबाव आणू शकते, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. प्रकृतीचे कारण देत यापूर्वी अनेक वेळा इंद्राणीने जामीन अर्ज केला होता. मात्र, दरवेळी न्यायालयाने जामीन नाकारला. अखेर डिसेंबर २०१९मध्ये इंद्राणीने केसच्या गुणवत्तेवर जामीन मागितला आणि बुधवारी न्यायालयाने तो अर्जही फेटाळला. पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल मुखर्जी, तिचा आधीचा पती संजीव खन्नाची मुलगी विधी खन्ना यांची साक्ष अद्याप न्यायालयात नोंदवायची आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्या. जे. सी. जगदाळे यांनी नोंदविले.

आरोपी प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती आहे, यात शंका नाही. त्यामुळे सरकारी वकिलांच्या साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले. तर, जामिनावर सुटका करण्याची विनंती करताना मुखर्जीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारी वकिलांच्या आरोपांत तथ्य नाही. इंद्राणी निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी १२० कागदपत्रे आपल्याकडे आहेत. गुन्हा घडला, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही शास्त्रीय पुरावे पोलिसांकडे नाहीत. शीना बोराच्या हत्येचा कट इंद्राणीने रचला, यासंदर्भात सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांत तारतम्य नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.मात्र, खटल्याच्या या टप्प्यावर सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांचे काय महत्त्व आहे, याचा निष्कर्ष काढू शकत नाही. त्यामुळे आरोपी व आरोपींच्या वकिलांनी हा खटला जलदगतीने संपवण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हणत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Indrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीCrime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय