शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:34 IST

Coronavirus In India: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून गेल्या २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.  पश्चिम बंगाल आणि केरळसह इतर काही राज्यांमध्ये मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली. कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये २० खाटांचा वॉर्ड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, "लोकांना घाबरण्याची गरज नाही. परंतु या धोकादायक आजाराबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे."

देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये 
देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळली आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या १ हजार ८०६ वर पोहोचली आहे. बकरी ईदच्या दिवशी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने सामाजिक अंतर पाळण्याचे निर्देशही दिले. शिवाय, मास्क घालण्यावरही भर देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्रात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात आतापर्यंत १ हजार २७६ रुग्णांची नोंद झाली. राज्यात गेल्या २४ तासांत ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण ५९२ सक्रीय रुग्ण आहेत. हरियाणा आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. हरियाणामध्ये कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण आढळले आहेत.  तामिळनाडूतील रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस