शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 09:27 IST

सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेअपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आता रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाला जीव गमवावा लागल्यास किंवा प्रवाशी जखमी झाल्यास त्याला पूर्वीपेक्षा १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. दरम्यान, याआधी २०१२ आणि २०१३ मध्ये रेल्वेने सानुग्रह अनुदानाच्या निधीमध्ये शेवटची सुधारणा केली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, रेल्वे अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या निधीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच रेल्वेच्या प्रथमदर्शनी दायित्वामुळे मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगवर अपघात झालेल्यांनाही अधिक भरपाई मिळणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.

किती रुपये मिळतील?रेल्वे आणि मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आता ५० हजार रुपयांऐवजी ५ लाख रुपये, तर गंभीर जखमींना २५ हजार रुपयांऐवजी २.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये मिळणार आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही अनुचित घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना, गंभीर जखमी आणि मध्यम जखमी प्रवाशांना अनुक्रमे १.५ लाख रुपये, ५० हजार रुपये आणि ५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल. 

इतर सुविधा...याचबरोबर, रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ३० दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल केल्यास त्यांना अतिरिक्त भरपाई मिळेल. तसेच, जखमी प्रवाशांना प्रत्येक १० दिवसांच्या कालावधीच्या शेवटी किंवा डिस्चार्जच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्यांना दररोज ३ हजार रुपये दिले जातील. दरम्यान, रेल्वे कायदा १९८९ नुसार अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAccidentअपघात