Corona : रेल्वेने तिकीट रिफंडच्या नियमांत केलाय मोठा बदल, तुम्हालाही माहीत असायलाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 09:45 AM2020-03-22T09:45:15+5:302020-03-22T09:51:38+5:30

या निर्णयानुसार आता, 21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान रेल्वेने एखादी रेल्वेगाडी रद्द केल्यास, कुठल्याही स्थानकावर प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार आहे. सध्या रेल्वे रद्द झाल्यानंतर तीन तासांच्या आतच रिंफंड मिळवता येतो.

indian railway relaxed ticket refund rules amid train cancellation due to coronavirus sna | Corona : रेल्वेने तिकीट रिफंडच्या नियमांत केलाय मोठा बदल, तुम्हालाही माहीत असायलाच हवा

Corona : रेल्वेने तिकीट रिफंडच्या नियमांत केलाय मोठा बदल, तुम्हालाही माहीत असायलाच हवा

Next
ठळक मुद्देआता प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान लागू असेल हा नियमटीडीआर फाइल करण्याचा कालावधी 10 दिवसांवरून 60 दिवस 

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता, 21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान रेल्वेने एखादी रेल्वेगाडी रद्द केल्यास, कुठल्याही स्थानकावर प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार आहे. सध्या रेल्वे रद्द झाल्यानंतर तीन तासांच्या आतच रिंफंड मिळवता येतो.

या शिवाय, रेल्वेगाडी रद्द न झाली नाही, मात्र या काळात प्रवाश्याला प्रवास करायचा नसेल तर त्याला प्रवासाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आता तो स्थानकावर जाऊन TDR (Ticket Deposit Receipt) फाइल करू शकतो. सध्या असे तीन दिवसांच्या आत करणे अनिवार्य होते.
 
या आदेशानुसार, चीफ कॉमर्शियल ऑफिसरसमोर टीडीआर फाइल करण्याचा कालावधी 10 दिवसांवरून 60 दिवस करण्यात आला आहे, तर ज्या प्रवाशाला 139 च्या माध्यमाने तिकीट रद्द करायचे असेल त्यांना प्रवासाच्या तारखेच्या 30 दिवस आगोदर कुठल्याही काउंटरवरून  रिफंड मिळवता येईल. सध्या रेल्वे रवाना होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत रिफंड मिळवता येत होता. 

भारतीय रेल्वेनने रविवारी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी 3700 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. 

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) 22 मार्चपासून खाण्यासंदर्भातील सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आला  रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. रेल्वेस्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद असेल.

Web Title: indian railway relaxed ticket refund rules amid train cancellation due to coronavirus sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.