भारतीय लष्कराला मिळाले ध्रुवास्त्र, शत्रूच्या रणगाड्यांची क्षणार्धात राखरांगोळी करेल हे क्षेपणास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:53 AM2020-07-22T11:53:44+5:302020-07-22T15:15:34+5:30

मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय लष्कराकडील शस्त्रसंपदा वाढवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराच्या भात्यात अजून एक मारक अस्र दाखल होणार आहे.

The Indian Army got a Dhruvastra, a missile that could instantly destroy enemy tanks | भारतीय लष्कराला मिळाले ध्रुवास्त्र, शत्रूच्या रणगाड्यांची क्षणार्धात राखरांगोळी करेल हे क्षेपणास्त्र

भारतीय लष्कराला मिळाले ध्रुवास्त्र, शत्रूच्या रणगाड्यांची क्षणार्धात राखरांगोळी करेल हे क्षेपणास्त्र

Next
ठळक मुद्दे भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे ध्रुवास्त्रओदिशा येथील बालासोर येथे १५-१६ जुलै रोजी या क्षेपणास्त्राची झाली यशस्वी चाचणी . या क्षेपणास्राचा वापर भारतीय लष्कराकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाईल

नवी दिल्ली - लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि नंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला अधिकाधिक शस्त्रसज्ज करण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय लष्कराकडील शस्त्रसंपदा वाढवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराच्या भात्यात अजून एक मारक अस्र दाखल होणार आहे. संपूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ बनावटीचे असलेले हे अस्त्र रणगाड्यावर स्वार होऊन येणाऱ्या शत्रू सैन्याच्या क्षणार्धात चिंधड्या उडवण्याची क्षमता या क्षेपणास्रामध्ये आहे.

 भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे ध्रुवास्त्र. ओदिशा येथील बालासोर येथे १५-१६ जुलै रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. त्यानंतर आता हे क्षेपणास्त्र भारतील लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या क्षेपणास्राचा वापर भारतीय लष्कराकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे. तसेच या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या क्षेपणास्त्राचा शत्रूविरोधात वापर केला जाणार आहे.

दरम्यान, या क्षेपणास्त्राची आता झालेली चाचणी ही हेलिकॉप्टरशिवाय करण्यात आली आहे. पुढे हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही याच्या चाचण्या होतील. या क्षेपणास्राचे आधीचे नाव नाग असे होते. मात्र आता त्याचे  नामांतर ध्रुवास्त्र असे करण्यात आले आहे.

चीनसोबत निर्माण झालेल्या जबरदस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण क्षेत्र देशाच्या सुरक्षेबाबत कमालीचे संवेदनशील झाले आहे. तर दुसरीकडे मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी डीआरडीओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वदेशी क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

Highlights

Web Title: The Indian Army got a Dhruvastra, a missile that could instantly destroy enemy tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.