coronavirus: कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 07:47 AM2020-07-21T07:47:57+5:302020-07-21T09:17:14+5:30

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात लस शोधण्यासाठी सध्या जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोना विरोधात लस शोधून काढण्यात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने बाजी मारली असून, ऑक्सफर्डने विकसित केलेली लस ही कोरोनाविरोधात परिणामकारक असल्याचे समोर आले आहे.

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात लस शोधण्यासाठी सध्या जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोना विरोधात लस शोधून काढण्यात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने बाजी मारली असून, ऑक्सफर्डने विकसित केलेली लस ही कोरोनाविरोधात परिणामकारक असल्याचे समोर आले असून, आता तिची चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

कोरोनाविरोधातील लसीसाठी विविध देशात संशोधन सुरू असतानाचा ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीला चांगले यश मिळाले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची ChAdOx1 हील लस प्रभावी दिसून आली असून, या लसीमुळे शरीरात अँटिबॉडी आणि टी सेल विकसित होत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कोरोनाविरोधात विकसित करण्यात येत असलेल्या लसीच्या मोहिमेचे नेतृत्व एक महिला करत आहे. तिचे नाव आहे सारा गिल्बर्ट. सारा गिल्बर्ट यांनी आपल्या नेतृत्वाखालील शेकडो संशोधकांच्या पथकासह दिवसरात्र एक करून अवघ्या काही महिन्यांत कोरोनाविरोधात प्रभावी लस विकसित करण्यात यश मिळवले आहे.

कोरोनाविरोधात विकसित करण्यात येत असलेल्या या लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे नेतृत्वसुद्धा सारा गिल्बर्ट करत आहेत. कोरोनाविरोधात विकसित करण्यात आळेली ही लस कोरोना विषाणूपासून लोकांना वाचवण्यासाठी ८० टक्के प्रभावी आहे. तसेच हिवाळ्याच्या पुढच्या ऋतूमध्ये लोकांना कोरोनाचा सामना करावा लागणार नाही कारण ही लस सप्टेंबर महिन्यापर्यंत बाजारात येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

गिल्बर्ट म्हणाल्या की, काही लसी या संसर्गाला थांबवत नाहीत पण आजारापासून वाचवण्यासाठी इम्युन सिस्टिम विकसित करतात. ज्याप्रकारे पोलिओवरील लस संसर्गाला थांबवत नाही पण लाखो लोकांना हा आजार होण्यापासून वाचवते. कोविड-१९ च्या बाबतीत प्राध्यापक गिल्बर्ट यांनी एक चिपँझी एडिनोव्हायरस (एक निष्क्रिय विषाणू) घेतला. त्यानंतर जेनेटिक मटेरियल SARS-CoV-2 व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनच्या माध्यमातून इंसर्ट केले आहे.

सारा गिल्बर्ट यांनी ब्रुइंग रिसर्च फाऊंडेशनसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर वेगवेगळ्या कंपन्यात काम करत औषध विकसित करण्याबाबत शिक्षण घेतले. दरम्यान, सारा ह्या १९९४ मध्ये ऑक्सफर्डमधील प्रोफेसर एड्रियन हिल्स लॅबमध्ये दाखल झाल्या. तिथे त्यांनी जेनेटिक्स आणि मलेरिया या आजारांवर काम करण्यास सुरुवात केली.

५८ वर्षीय सारा यांनी संशोधनाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. १९९८ मध्ये सारा यांनी तिळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतरही केवळ १८ आठवड्यांची मॅर्टर्निटी लिव्ह घेऊन त्या कामावर हजर झाल्या होत्या. एखाद्या संशोधकाने वर्षभर रजा घेतल्यास त्याचा संशोधनावर परिणाम होऊ शकतो, असे त्या सांगतात.

२००४ मध्ये सारा ह्या युनिव्हर्सिटी रीडर बनल्या. त्यानंतर तीन वर्षांतच त्यांना पहिला फ्लू व्हॅक्सिन प्रोजेक्ट मिळाला. वेलकम ट्रस्टकडून मिळालेल्या या प्रोजेक्टमध्ये सारा यांनी टीमचे नेतृत्व केले होते.

अजून एक विशेष बाब म्हणजे कोरोनावरील लस विकसित होत असताना सारा यांनी आपल्या तिन्ही मुलांनाही कोरोनावरील चाचणीमध्ये सहभागी करून घेतले होते. तसेच प्रयोगात्मक लस त्यांना टोचून त्याचे परीक्षण केले होते. मात्र प्रयोगाच्या टप्प्यात असलेल्या या लसीची स्वत:च्या मुलांवर चाचणी घेताना आपल्याला अजिबात भीती वाटली नाही, असे सारा सांगतात.