भारत फ्रान्सकडून करणार १०० राफेलची खरेदी; पी-८ आय टेहळणी विमान, नौदल शस्त्रांचीही खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:40 IST2026-02-08T06:39:59+5:302026-02-08T06:40:38+5:30

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येत आहेत

India to buy 100 Rafales from France; P-8I surveillance aircraft, naval weapons also to be purchased | भारत फ्रान्सकडून करणार १०० राफेलची खरेदी; पी-८ आय टेहळणी विमान, नौदल शस्त्रांचीही खरेदी

भारत फ्रान्सकडून करणार १०० राफेलची खरेदी; पी-८ आय टेहळणी विमान, नौदल शस्त्रांचीही खरेदी

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली - शत्रुराष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याची तयारी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) लष्करासाठी शंभरपेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने, पी-८ आय मरिटाइम पॅट्रोल आणि अंटी सबमरिन वारफेअर एअरक्राफ्ट तसेच मरिन गॅस टर्बाईन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याची तयारीत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी ७ लाख ८४ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील २ लाख १९ हजार ३०६ लाख कोटी रुपये शस्त्रसाठा लढाऊ विमाने, अत्याधुनिक शस्त्रे, जहाज, पाणबुड्या, ड्रोन आदींवर खर्च केला जाणार आहे. 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन या महिन्यात भारतात येणार

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येत आहेत. मॅक्रॉन भारतात येण्यापूर्वी राफेल विमाने खरेदी प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता घेतली जाऊ शकते. याशिवाय, अमेरिकेकडून फायटर जेट विमाने खरेदी करण्याच्या रखडलेल्या प्रस्तावावरही पुनर्विचार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. यासाठी डीएसीची महत्त्वाची बैठक पुढील ३ आठवड्यात दिल्लीत होणार आहे. सुरक्षा दलासाठी शस्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डीएसी होय.

Web Title : भारत फ्रांस से खरीदेगा 100 राफेल, नौसेना हथियार भी

Web Summary : भारत राफेल लड़ाकू विमान, पी-8आई समुद्री गश्ती विमान और नौसेना हथियार खरीदने की तैयारी कर रहा है। रक्षा अधिग्रहण परिषद (डीएसी), बड़े रक्षा बजट के साथ, फ्रांसीसी राष्ट्रपति मैक्रॉन की यात्रा से पहले प्रस्तावों पर विचार करेगी। अमेरिकी लड़ाकू विमानों पर भी निर्णय अपेक्षित है।

Web Title : India to Buy 100 Rafale Jets from France, Naval Arms

Web Summary : India prepares to acquire Rafale fighter jets, P-8I maritime patrol aircraft, and naval weaponry. The DAC, with a large defense budget, will consider proposals before French President Macron's visit. A decision on US fighter jets is also expected.