शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 23:29 IST

Delhi On High Alert: अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी एका गटाचा पर्दाफाश केला होता.

Delhi On High Alert: राजधानी दिल्लीला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या काही संवेदनशील माहितीनंतर दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. तसेच दिल्लीतील अनेक संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भाजपा मुख्यालय, सरकारी कार्यालये, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी दहशतवादी हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासूनच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय, दीनदयाल उपाध्याय मार्गावरील कार्यालये आणि आजूबाजूच्या शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले असून, बॅरिकेड्स वाढवण्यात आले आहेत. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दिल्लीतील प्रमुख कार्यालये आणि गर्दीच्या भागांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी माहिती यंत्रणांना मिळाली आहे. संभाव्य हल्ल्यांमध्ये आत्मघाती हल्ले, वाहनांमधील स्फोटके, गोळीबार आणि समन्वित हल्ल्यांचा समावेश आहे.

सुरक्षा यंत्रणा संपूर्ण शहरात सतत पाळत ठेवून आहेत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या सरकारी इमारती, राजकीय कार्यालये, बाजारपेठा, वाहतूक केंद्रे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी घातपात प्रतिबंधक तपासणी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण शहरात सतत पाळत ठेवून आहेत. बॉम्ब शोधक पथके, स्निफर डॉग पथके आणि जलद प्रतिसाद पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी दिल्ली अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संवेदनशील भागांमधील संशयास्पद हालचाली, बेवारस वस्तू आणि पार्क केलेल्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

स्थानिक पोलिसांकडून तपासणी, पडताळणी मोहीम

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये आणि वस्त्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून अचानक तपासणी आणि पडताळणी मोहीम राबवली जात आहे. गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या समन्वयाने सर्व जिल्हा युनिट्सना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी एका गटाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. हा गट दिल्लीत मोठ्या प्रमाणात लक्ष्यित हल्ल्यांची तयारी करत होता, अशी माहिती यातून पुढे आली. या गटाने राजधानीतील एका मंदिरासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली होती. याचे व्हिडिओ त्यांच्या सूत्रधारांना पाठवले होते. महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा दलांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi on High Alert: Terror Attack Threat Looms Over Key Sites

Web Summary : Delhi is on high alert following intelligence inputs about a potential terror attack targeting BJP headquarters and government offices. Security has been heightened across the city, with increased patrols and checks. Authorities are on guard against suicide attacks, vehicle explosions, and coordinated assaults after recent arrests exposed a Pakistan-linked terror plot.
टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी