Join us
Daily Top 2Weekly Top 5

'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी

गुजरात टायटन्सच्या संघाने प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम, राजस्थान रॉयल्ससमोर नवे आव्हान

By सुशांत जाधव | Updated: May 9, 2026 23:39 IST

Open in App

Rajasthan Royals vs Gujarat Titans, 52nd Match Result : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सच्या संघासमोर २३० धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ सपशेल अपयशी ठरला. शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत राशिद खान आणि जेसन होल्डच्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरातने ७७ धावांनी विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयासह गुजरातच्या संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी प्लेऑफ्सची शर्यत आव्हानात्मक झाली आहे. ११ सामन्यानंतर त्यांच्या खात्यात ६ विजयासह १२ गुण जमा असून ते पाचव्या स्थानावर आहेत. आता उर्वरित ३ पैकी किमान २ सामने त्यांना जिंकावेच लागतील.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

यशस्वी जैस्वालनं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना टॉस जिंकला, पण...

रियान परागच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल याला नेतृत्वाची पहिली संधी मिळाली. नाणेफेक जिंकत त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय शुभमन गिल आणि साई सुदर्शन जोडीनं व्यर्थ ठरवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. गिलने ४४ चेंडूत ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे साई सुदर्शनने ३६ चेंडूत ५५ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. शेवटच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदरने २० चेंडूत नाबाद ३७ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकांत ४ बाद २२९ पर्यंत पोहोचवली. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज ब्रिजेश शर्मा याने २ विकेट घेतल्या, तर यशराज पुंजा आणि जडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास

राशिद खानसह जेसन होल्डरचा जलवा

गुजरात टायटन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना धावांचा वैभव सूर्यवंशी याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजनं त्याचा खेळ खल्लास केला.  वैभव १६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. रबाडाने यशस्वी जैस्वाल याला  ३ धावांवर बाद करत संघाला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळून दिले. राशिद खान याने १० चेंडूत २४ धावा करणाऱ्या ध्रुव जुरेल याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यासह RR कडून सर्वाधिक ३८ धावा करणाऱ्या रविंद्र जडेजासह डेनोव्हान फरेरा आणि शुभम दुबेची विकेट घेत राशिद खानने चार विकेट्सचा डाव साधला. जेसन होल्डरनं पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या. या दोघांशिवाय कगिसो रबाडाच्या दोन आणि मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. परिणामी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १५२ धावांवर आटोपला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashid Khan's magic, GT dominates RR, secures massive victory.

Web Summary : Gujarat Titans secured a massive victory against Rajasthan Royals, climbing to second place in the standings. Rashid Khan's bowling spell crippled RR's batting lineup, jeopardizing their playoff hopes.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सशुभमन गिलवैभव सूर्यवंशीयशस्वी जैस्वाल