“ही पाकची जुनी सवय”; इस्लामाबाद स्फोटावर भारताची पहिली प्रतिक्रिया, आरोपांना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 08:41 IST2026-02-07T08:39:55+5:302026-02-07T08:41:17+5:30

India First Reaction on Islamabad Pakistan Blast: पाकिस्तानच्या संरक्षण खात्याने या हल्ल्यामागे भारत व अफगाणिस्तान असल्याचा आरोप केला आहे.

india first reaction to the pakistan islamabad blast and a blunt reply to the allegations | “ही पाकची जुनी सवय”; इस्लामाबाद स्फोटावर भारताची पहिली प्रतिक्रिया, आरोपांना सडेतोड उत्तर

“ही पाकची जुनी सवय”; इस्लामाबाद स्फोटावर भारताची पहिली प्रतिक्रिया, आरोपांना सडेतोड उत्तर

India First Reaction on Islamabad Pakistan Blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शुक्रवारच्या नमाजदरम्यान एका शिया मशिदीत आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. या शक्तिशाली स्फोटात किमान ६९ जण ठार झाले असून १६९ जखमी झाले. हा भीषण स्फोट शहरातील शहजाद टाऊन भागातील तरलाई येथे 'खादिजतुल कुब्रा मशीद-सह-इमामबारगाह' या शिया धार्मिक केंद्रामध्ये झाला. यासंदर्भात आता भारताकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

या केंद्रात नमाज सुरू असताना हल्लेखोराने मुख्य प्रवेशद्वारावरून आत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला रोखण्यात आले. त्यावेळी त्याने स्वतःला उडवून दिले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. मात्र, हल्लेखोर परदेशी असून पाकिस्तानच्या संरक्षण खात्याने या हल्ल्यामागे भारतअफगाणिस्तान असल्याचा आरोप केला आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतावर आरोप करून पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत समस्यांवरून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

इस्लामाबादमधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट निषेधार्ह आहे

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लामाबादमधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट निषेधार्ह आहे. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांप्रती भारत शोक व्यक्त करतो. भारत अशा कोणत्याही निराधार आरोपांचे खंडन करत आहे. स्वतःच्या सामाजिक आणि सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याऐवजी पाकिस्तानला वारंवार बाह्य शक्तींना दोष देण्याची सवय लागली आहे, अशी टीका भारताने केली आहे. 

दरम्यान, हे दुर्दैवी आहे की, पाकिस्तान आपल्या देशांतर्गत समस्या गांभीर्याने सोडवण्याऐवजी इतरांना दोष देऊन स्वतःला फसवत आहे, असे भारताने निवेदनात म्हटले आहे. दुसरीकडे, गेल्या दशकातील पाकिस्तानच्या राजधानीत झालेल्या हल्ल्यांपैकी हा सर्वांत घातक हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यातील जखमींना इस्लामाबादसह अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी हल्लेखोर TTP शी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

 

Web Title : भारत ने इस्लामाबाद विस्फोट की निंदा की, पाकिस्तान के आरोपों को नकारा।

Web Summary : भारत ने इस्लामाबाद मस्जिद में हुए बम विस्फोट की कड़ी निंदा की और पाकिस्तान के आरोपों का खंडन किया। भारत ने पाकिस्तान की आंतरिक सुरक्षा चुनौतियों का समाधान करने के बजाय बाहरी ताकतों को दोष देने की आदत की आलोचना की। भारत को लगता है कि पाकिस्तान खुद को धोखा दे रहा है।

Web Title : India condemns Islamabad blast, slams Pakistan's blame game habit.

Web Summary : India strongly condemned the Islamabad mosque bombing, expressing grief and refuting Pakistan's accusations of involvement. India criticized Pakistan's habit of blaming external forces instead of addressing its internal security challenges. India finds Pakistan is deceiving itself.