Sambit Patra : "टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:46 IST2026-02-20T17:45:41+5:302026-02-20T17:46:23+5:30

BJP Sambit Patra And Congress Rahul Gandhi : भाजपाच्या संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

india ai impact summit 2026 BJP Sambit Patra on Congress lashes out at shirtless protest at ai summit Rahul Gandhi | Sambit Patra : "टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

Sambit Patra : "टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

भाजपाच्या संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये अटक करण्यात आलेले चार तरुण हे युवक काँग्रेसचे नेते असून काँग्रेसमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबित पात्रा म्हणाले, "आज जेव्हा मी इथे आलो तेव्हा माझ्या मनात प्रचंड राग होता, पण मी स्वतःला मोठ्या कष्टाने सावरले. हा आक्रोश केवळ भाजपा प्रवक्त्याचा नाही, तर संपूर्ण भारतातील 'GenZ' चा आहे. ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी नसून भारत विरुद्ध भारताची प्रतिमा मलीन करणाऱ्या शक्तींच्या विरोधात आहे."

पात्रा यांनी दावा केला की, या चार जणांनी समिटमध्ये रीतसर नोंदणी करून आणि बारकोड मिळवून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपले कपडे काढून निदर्शने केली. हा सर्व कट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधींच्या निवासस्थानी रचला गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

"टॉपलेस, ब्रेनलेस आणि शेमलेस"

काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की, "राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे गद्दार असून शुभ कार्यात विघ्न आणणारे व्यक्ती आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' असो वा एअर स्ट्राईक, ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. काँग्रेससाठी माझ्याकडे तीन शब्द आहेत – 'टॉपलेस, ब्रेनलेस आणि शेमलेस'. ही भाजपाची परिषद किंवा कार्यकारिणी नाही, तर भारताची 'AI समिट' आहे. मी सर्व तरुणांना सांगेन की, मोबाईलवर नेहरू आणि एडमिना यांचे फोटो शोधा, ते भारताला सापांचा देश म्हणत होते आणि हसत होते. जे नेहरूंनी केलं तेच आज राहुल गांधी करत आहेत."

काय आहे नेमकं प्रकरण?

भारत मंडपम येथे सुरू असलेल्या 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट' दरम्यान युवक काँग्रेसच्या (IYC) काही सदस्यांनी शर्टलेस होऊन निदर्शनं केली. या तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी ४ ते १० जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या जागतिक परिषदेत पंतप्रधान मोदींसह गुगल आणि OpenAI सारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. भारताला 'ग्लोबल साउथ'मध्ये AI क्षेत्रात नेतृत्व मिळवून देण्यासाठी हे महत्त्वाचं व्यासपीठ आहे. मात्र या घटनेमुळे राजकीय वादंग निर्माण झाला असून या कटाबाबत युवक काँग्रेसकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.
 

Web Title : भाजपा का आरोप, राहुल गांधी ने एआई शिखर सम्मेलन में नग्न विरोध प्रदर्शन रचा

Web Summary : भाजपा ने राहुल गांधी पर एआई शिखर सम्मेलन में नग्न विरोध प्रदर्शन रचने का आरोप लगाया। युवक कांग्रेस के सदस्यों ने कार्यक्रम को बाधित किया, जिसके कारण गिरफ्तारियां हुईं। पात्रा ने गांधी को गद्दार कहा।

Web Title : BJP Alleges Rahul Gandhi Orchestrated Topless Protest at AI Summit

Web Summary : BJP accuses Rahul Gandhi of plotting a topless protest at the AI summit. Youth Congress members disrupted the event, leading to arrests. Patra calls Gandhi a traitor.