शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित... लैंगिक अत्याचार करणार्‍या सावंतवर बलात्काराचा गुन्हा दाखल

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

१३ वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार : पोलीस तपासात निष्पन्न

१३ वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार : पोलीस तपासात निष्पन्न
पुणे : खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणारा आयएएस अधिकारी मारुती हरी सावंत (वय ५८) एका तेरा वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंतवर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हाही दाखल केला असून पीडित मुलींची वैद्यकीय तापासणीही केली आहे. दरम्यान, शुक्रवारी न्यायालयात आणले असता आवारातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविकांनी त्याला चपलांचा हार घातला. न्यायालयाने सावंत याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत काशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुरूवारी सावंत याला अटक केली. त्याने दुसरीतील दोन आणि सातवीतील तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सातवीतील तेरा वर्षांच्या मुलीवर तो तीन वर्षांपासून बलात्कार करत होता, अश्लील सीडीही दाखवीत होता. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचा महासंचालक असलेल्या सावंत याने हिंगणे परिसरातील सासर्‍याच्या मालकीच्या सदनिकेत हा घृणास्पद प्रकार केला. मुलींनी शाळेत समुपदेशनादरम्यान घडलेल्या गैरप्रकाराची माहिती दिली होती. शाळेने नगरसेवक श्रीकांत जगताप यांना कळविल्यावर सावंतवर गुन्हा दाखल झाला.
विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टासमोर सावंत याला हजर करण्यात आले. सावंतवर कलम ३७६, ३५४ (अ)(ब), ५०६ , बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४,६,८ आणि १०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ), (ब) , ॲट्रासिटी कायदा कलम ३(१),(११)(१२), ३ (२)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सावंतच्या घरामधून अश्लील सीडी आणि संगणक जप्त करण्यात येणार आहे. सावंतने हा प्रकार नेमका कधीपासून केला आहे, त्याने आणखी काही मुलींसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केले आहेत काय आदी तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील लीना पााठक यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य करून त्याला ११दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी पिडीत मुलींची वैद्यकीय चाचणीही करुन घेतली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस बंदोबस्तामध्येच मनसेच्यानगरसेविकांनी सावंतला चपलांचा हार घातला. या सर्वजणींना अटक करण्यात आली होती. संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली.

--------