राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:02 IST2026-03-07T16:01:38+5:302026-03-07T16:02:18+5:30

आज तंत्रज्ञानावर चीनचे वर्चस्व आहे. ही आपल्यासाठी एक मोठी समस्या आहे, कारण आपण अशा काही देशांपैकी एक आहोत, ज्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याची क्षमता आहे. योग्य धोरणे आणि दृष्टिकोन असल्यास, भारत चीनशी स्पर्धा करू शकतो, असा माझा विश्वास आहे."

If not in politics, where would it be Rahul Gandhi clearly said it He also made a big comment regarding India, China, America, England | राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं

राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं

काँग्रेस नेते राहुल गांधी जर राजकारणात नसते, तर नक्की कुठे आणि काय असते? यासंदर्भात खुद्द राहुल गांधींनीच भाष्य केले आहे. ते सध्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेतर. दरम्यान ते म्हणाले, जर आपण राजकीय संघटनेत नसतो तर कदाचित एयरोस्पेस क्षेत्रात उद्योजक म्हणून कार्यरत असतो. आपण स्वतः पायलट आहोत. आपले वडील आणि काकाही पायलट होते. तेसच, "आपण प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुक असायला हवे. आपण खुल्या विचाराचे असायला हवे," असेही राहुल गांधी म्हणाले.

...तर भारत चीनशी स्पर्धा करू शकतो -
जागतिक राजकारणावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, "जगातील बदलांच्या आधारावरच धोरणे आखायला हवीत. अमेरिका आणि ब्रिटनने दळणवळण, नौसेना आणि ऊर्जा स्त्रोतांवर नियंत्रण मिळवून आपली शक्ती निर्माण केली. आज तंत्रज्ञानावर चीनचे वर्चस्व आहे. ही आपल्यासाठी एक मोठी समस्या आहे, कारण आपण अशा काही देशांपैकी एक आहोत, ज्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याची क्षमता आहे. योग्य धोरणे आणि दृष्टिकोन असल्यास, भारत चीनशी स्पर्धा करू शकतो, असा माझा विश्वास आहे."

लघु उद्योगांना संपवून आपण रोजगाराची अपेक्षा कशी करू शकतो - राहुल गांधी
देशाच्या आर्थ व्यवस्तेसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, सध्याची संपूर्ण व्यवस्था केवळ तीन-चार मोठ्या व्यवसायांच्या नियंत्रणात आहे. हे व्यवसाय स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे नुकसान करत आहेत. जीएसटीच्या (GST) अंमलबजावणीमुळे लघु आणि मध्यम उद्योग संपले आहेत, परिणामी देशात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. लघु उद्योगांना संपवून आपण रोजगाराची अपेक्षा कशी करू शकतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


 

Web Title : राहुल गांधी का खुलासा: राजनीति नहीं, तो क्या करते; चीन पर टिप्पणी।

Web Summary : राहुल गांधी ने बताया कि राजनीति में न होते तो एयरोस्पेस उद्यमी होते। उनका मानना है कि सही नीतियों से भारत चीन से मुकाबला कर सकता है, लेकिन वर्तमान आर्थिक व्यवस्था छोटे उद्योगों को नुकसान पहुंचा रही है, जिससे रोजगार कम हो रहे हैं।

Web Title : Rahul Gandhi reveals alternative career, comments on India, China, US.

Web Summary : Rahul Gandhi envisions himself as an aerospace entrepreneur if not in politics. He believes India can rival China with the right policies, highlighting concerns about current economic systems favoring large businesses over small and medium enterprises, impacting job creation.