लैंगिक संबंधास नकार दिला की ‘तो’ करायचा हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 08:59 IST2024-08-10T08:58:15+5:302024-08-10T08:59:26+5:30

कुलदीप असे या सिरियल किलरचे नाव आहे. बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

If he refuses to have sex, he will kill him | लैंगिक संबंधास नकार दिला की ‘तो’ करायचा हत्या

लैंगिक संबंधास नकार दिला की ‘तो’ करायचा हत्या

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथे महिलांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला शुक्रवारी अटक करण्यात आली. कुलदीप असे या सिरियल किलरचे नाव आहे. बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आर्य यांनी सांगितले की, आरोपी महिलांचा राग करीत असे. तो महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर तो त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायचा. महिलांनी नकार दिल्यावर तो त्यांची हत्या करत असे. हत्येचा पॅटर्नही एकसारखाच होता. आरोपी महिलांचा साडीने गळा आवळून खून करायचा. आरोपीने आतापर्यंत ६ खुनांची कबुली दिली असून, पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

बरेली जिल्ह्यातील शाही आणि शिशगढ भागात गेल्या १४ महिन्यांत नऊ महिलांची हत्या करण्यात आली आहे. मृतदेह झुडपातून किंवा शेतात टाकण्यात आले होते. खून झालेल्या सर्व महिलांचे वय ४५ ते ५५ वर्षांदरम्यान आहे. 

Web Title: If he refuses to have sex, he will kill him