शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:08 IST

Ravneet Singh Bittu Criticize Rahul Gandhi: भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस पक्ष खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विधानाचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधी यांना एकदा नाही तर १०० वेळा दहशतवादी म्हणेन, असा इशारा बिट्टू यांनी दिला.

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस पक्ष खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विधानाचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधी यांना एकदा नाही तर १०० वेळा दहशतवादी म्हणेन, असा इशारा बिट्टू यांनी दिला. 

न्यूज १८ च्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर टीका करताना रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी पन्नू आणि पाकिस्तान हा  संपूर्ण त्रिकोण तुमच्या समोर आला आहे. नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस हेच सांगत आहेत की, कलम ३७० पुन्हा लागू केलं जाईल. तर दुसरीकडे शिखांना खिळखिळे करण्यासाठी पगडी आणि कड्याबाबत बोलत आहेत. त्याच गोष्टी पन्नू बोलत आहे आणि तेच पाकिस्तान बोलत आहे.  

यावेळी राहुल गांधी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत विचारलं असता रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्याबाबत अजिबात मवाळ भूमिका घेतलेली नाही. माझं जे विधान होतं, ते इतर अनेक लोकांसोबत जोडलं गेलं. राहुल गांधींबाबत आज नड्डा यांनी खूप भक्कमपणे अगदी योग्य पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षांना उत्तर दिलं आहे, असेही रवनीत सिंग बिट्टू म्हणाले.  

रवनीत सिंग बिट्टू पुढे म्हणाले की, आम्ही हुतात्म्याच्या कुटुंबातील आहोत. त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आम्हाला बलिदान द्यावं लागलं, कारण गांधी कुटुंबीयांनी येथे आग लावली होती. तीच आग जम्मू-काश्मीरमध्ये लावली. यांचा बचाव करण्यासाठी पन्नू आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री उभे राहिले. जे वक्तव्य पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलं आहे, तसेच जे काही पन्नू बोलला आहे, त्याला पाठिंबा देतात की विरोध करतात, हे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट करावं, असे आव्हानही बिट्टू यांनी दिलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा