"सरेंडर करणार नाही, मग मृत्यू का येईना...!"; इराण युद्धावर शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद नकवी यांचा आक्रमक पवित्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 21:06 IST2026-03-07T21:05:03+5:302026-03-07T21:06:52+5:30

"सरकारने परवानगी दिली तर येथील हजारो लोक इराणमध्ये जाऊन लढण्यास तयार आहेत, परंतु आम्ही कायद्याचे पालन करतो आणि तो मोडू इच्छित नाही," असेही मौलाना नकवी यांनी म्हटले आहे.

I won't surrender Then even if death comes it will be okay Shia cleric Maulana Syed Kalbe Jawad Naqvi's aggressive stance on the Iran war! | "सरेंडर करणार नाही, मग मृत्यू का येईना...!"; इराण युद्धावर शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद नकवी यांचा आक्रमक पवित्रा!

"सरेंडर करणार नाही, मग मृत्यू का येईना...!"; इराण युद्धावर शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद नकवी यांचा आक्रमक पवित्रा!

"इराणसोबत कोणताही चर्चा नाही," असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केल्यानंतर, आता शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कल्बे जवाद नकवी यांनीही थेटच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "करबलावर विश्वास असणारे कधी सरेंडर करत नाहीत. मग मृत्यू का येईना! इराण कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करणार नाही. इराण जगासमोर एकटा उभा आहे, असे म्हणत आमची ट्रम्प यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही." 

ते पुढे म्हणाले, "ट्रम्प यांनी दावा केला की सर्वोच्च नेत्याच्या मृत्युनंतर लोक सर्व ताब्यात घेतील, पण असे घडले का? यावरून सर्वांनी खमेनींना पाठिंबा दिल्याचे सिद्ध होते. त्यांनी माफियांसमोर झुकण्यास नकार दिला. इराण कधीही शरणागती पत्करणार नाही." दरम्यान, सरकारने परवानगी दिली तर येथील हजारो लोक इराणमध्ये जाऊन लढण्यास तयार आहेत, परंतु आम्ही कायद्याचे पालन करतो आणि तो मोडू इच्छित नाही," असेही मौलाना नकवी यांनी म्हटले आहे.

अब्दुल मजीद हकीम इलाही यांची प्रतिक्रिया
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचे दिल्लीतील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनीही अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला. ते म्हणाले, "ही परिस्थिती कुणालाही नको होती. आपली स्थिती चांगली नाही, अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला आहे. आमच्या प्रतिष्ठेसाठी, नैतिकतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आम्हाला स्वतःचे संरक्षण करावे लागेल. त्यांनी बलिदानासंदर्भात भाष्य केले आणि इराणचे भविष्य चांगले असेल असा विश्वासही व्यक्त केला.

Web Title : ईरान आत्मसमर्पण नहीं करेगा, चाहे मौत आ जाए: शिया धर्मगुरु

Web Summary : शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद नकवी ने कहा ईरान आत्मसमर्पण नहीं करेगा, अमरीकी आक्रमण का विरोध किया। उन्होंने ट्रम्प के दावों को खारिज करते हुए खामेनेई के समर्थन पर जोर दिया। दिल्ली में ईरानी प्रतिनिधि ने हमलों की निंदा की, ईरान की गरिमा और स्वतंत्रता की रक्षा करने की कसम खाई। अनुमति मिलने पर हजारों लोग लड़ने के लिए तैयार हैं।

Web Title : Iran will not surrender, even if death comes: Shia cleric

Web Summary : Shia cleric Maulana Kalbe Javad Naqvi asserts Iran won't surrender, echoing sentiments against US aggression. He dismisses Trump's claims, emphasizing support for Khamenei. An Iranian representative in Delhi condemned the attacks, vowing to defend Iran's dignity and independence. Thousands are ready to fight if permitted.