शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Encounter : 4 दिवसांपूर्वीच मंत्रीमहोदयांना सूचवला होता 'एन्काऊंटर', व्हायरल होतंय ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 13:31 IST

Hyderabad Encounter : तेलंगणातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष

हैदराबाद - हैदराबादमधील 'दिशा' रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात येत आहे. नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. जनभावना पोलिसांच्या पाठिशी असल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे 1 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एका ट्विटप्रमाणेच आजची घटना घडली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हे ट्विटही ट्रेंड करत आहे.

तेलंगणातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि मंत्री केटी रामाराव यांनी 1 डिसेंबर रोजी हैदराबादेतील बलात्कार आणि खूनप्रकरणी ट्विट केले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेन्शन/टॅग करत त्यांनी मेसेज लिहिला होता. तसेच, दिशा रेड्डीच्या न्यायासाठी प्रार्थना केली होती. निर्भया प्रकरणातील आरोपींना 7 वर्षे झाली तरी फाशी देण्यात आली नाही. 9 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्यानंतर सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, पण हायकोर्टाने ती शिक्षा जन्मठेपेत बदलली. आता, हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक महिलेचा क्रुरपणे खून करण्यात आलाय. असे म्हणत मोदींकडे हैदराबाद पीडितेच्या न्यायाची मागणी केली होती. संसदेत अधिवेशनावेळी हा विषय घ्यावा, पीडितांना लवकर न्याय मिळावा. न्यायाला उशिर होतोय, असं केटीआर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. केटीआर यांच्या ट्विटला रिट्विट करत एका अकाऊंट युजरने एक मार्ग सूचवला होता.  konafanclub नावाने हे अकाऊंट ट्विटरवर कार्यरत होते. मात्र, आज हे अकाऊंट अस्तित्वात नाही. पण, या अकाऊंटचे स्क्रीनशॉट ट्विटरवर ट्रेंड होत आहेत, व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, ''सर, जर तुम्हाला वाटत असेल की, त्यांना शिक्षा व्हावी. तर, त्या आरोपींना सीन रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी घटनास्थळावर घेऊन जावे, मला खात्री आहे की ते तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळी, मला निश्चित खात्री आहे की, आपल्या पोलिसांकडे त्यांना गोळी मारल्याशिवाय पर्याय नसेल.'', असं ट्विट @konafanclub ने केले होते. हैदराबाद पोलिसांची कारवाईही अगदी तशीच घडली आहे. मात्र, आज या युजरचे अकाऊंट अस्तित्वातच नाही. हे युजर unavailable असे दिसत आहे. 

 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीTwitterट्विटरministerमंत्री