शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:49 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील लोधा परिसरात झालेल्या इलेक्ट्रिकशियनच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना मृताच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील लोधा परिसरात झालेल्या इलेक्ट्रिकशियनच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना मृताच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोन इतर आरोपी फरार आहेत. प्रेमप्रकरणामधून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासामधून समोर आली आहे.

पतीची हत्या केल्यानंतर आरोपींनी अपघातामुळे मृत्यू झाल्याचे भसवण्यासाठी मृतदेह गाडीत ठेवून एका रस्त्यावर फेकून दिला. या हत्याकांडाबाबत माहिती देताना एसपी मृगांक शेखर पाठक यांनी सांगितले की, मृत व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि मित्रांनी घडवून आणली.  १७ डिसेंबर रोजी लोधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकरावत गाावामधील हैबतपूर मार्गावर एक अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला होता. तसेच गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली.

या प्रकरण पोलिसांनी सखोल तपासास सुरुवात करून कॉल डिटेल तपासली तेव्हा हत्या झाली त्या दिवशी मृताच्या पत्नीने फोनवरून सात वेळा संभाषण केल्याचं समोर आलं. त्याआधारावर पोलिसांनी संबंधित एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा संपूर्ण कटकारस्थान उघडकीस आलं.

मृत राजकुमार याची पत्नी ज्योती शर्मा हिचे बॉबी कुमार याच्यासोबत अनैतिक संबंध होते, अशी माहिती पोलीस तपासामधून समोर आली. तसेच या अनैतिक संबंधांबाबत राजकुमार याला कुणकुण लागल्यावर दोघांमध्ये वाद वाढल्याचेही तपासातून उघड झाले. त्यामुळेच  बॉबी कुमार याने त्याच्या संदीप, हरीश, सनी या सहकाऱ्यांच्या मदतीने ज्योती शर्मा हिच्यासोबत मिळून राजकुमार याची हत्या केल्याचे तपासातून समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी बॉबी, संदीप आणि ज्योती कुमार यांना अटक केली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife, lover kill husband; one mistake leads to arrest.

Web Summary : In Uttar Pradesh, a woman, her lover, and an accomplice were arrested for murdering her husband. They tried to stage a road accident to cover their crime, but police found inconsistencies in their statements and phone records, revealing the affair and murder plot.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश