शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 15:42 IST

राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भाजपाच्या दोन नेत्यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. 

राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. भरत मालानी आणि अशोक सिंह अशी या नेत्यांची नावे आहेत. त्याना ब्यावर उदयपूरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे. मालानी यांच्या कॉल रेकॉर्डिंगवरून आमदारांचा घोडेबाजार केला जात असल्याचे समजले, असे या पथकाने म्हटले आहे. 

सध्या या दोन्ही नेत्यांची जयपूरमध्ये चौकशी सुरु आहे. भरत मालानी यांनी राजस्थान भाजपामध्ये मोठमोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. राजस्थान सरकार पाडण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली एसओजीने गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार काही फोन रेकॉर्डिंग वरून अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी कट रचला जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद सुरु आहेत, असे पसरविले जात आहे. यामुळे काही जण अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांना फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते आमदारांना यासाठी पैशांचे लालच दाखवत आहेत आणि आपल्या बाजुला करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप या प्रकरणाचा तपास करत आहे. 

गेहलोत यांचा टोलाया प्रकरणानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये गेहलोत यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसमध्येच गटबाजी सुरु आहे का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री कोणाला व्हावे असे वाटत नाहीय? पण उपमुख्यमंत्र्यांसोबत वाद अजिबात नाहीय, असे म्हटले. एसओजीने आमदारांच्या खरेदीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उप मुख्यमंत्री सचिन पायलट आणि महेश जोशी यांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. 19 जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे प्रलोभन दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याची चौकशी एसओजीकडे देण्यात आली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थान