महामार्ग बनला मृत्युमार्ग, भरधाव ट्रकची ८ दुचाकींना धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:33 IST2025-11-30T15:29:43+5:302025-11-30T15:33:39+5:30

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील मोतिहारी येथे महामार्गावर एक भीषण अपघात झााला आहे. येथे महामार्ग ओलांडण्यासाठी वाट पाहत असलेल्या ८ दुचाकी आणि एका ई रिक्षाला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

Highway becomes death road, speeding truck hits 8 two-wheelers, 5 people die on the spot | महामार्ग बनला मृत्युमार्ग, भरधाव ट्रकची ८ दुचाकींना धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू 

महामार्ग बनला मृत्युमार्ग, भरधाव ट्रकची ८ दुचाकींना धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू 

उत्तर प्रदेशमधील मोतिहारी येथे महामार्गावर एक भीषण अपघात झााला आहे. येथे महामार्ग ओलांडण्यासाठी वाट पाहत असलेल्या ८ दुचाकी आणि एका ई रिक्षाला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घातल घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा अपघात आज दुपारी १२.३० मिनिटांच्या सुमारास झाला. कोटवा येथील दीपऊ वळणाजवळ माहमार्ग पार करण्यासाठी अनेक दुचाकीस्वार, ई-रिक्षा आणि काही पादचारी उभे होते. यादरम्यान, एक भरधाव ट्रक नियंत्रण सुटून त्यांच्यादिशेने आला. तसेच दुभाजक तोडून या ट्रकने रस्ता पार करण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांना धडक दिली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर काही जण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर घटनास्थळावर गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. जखमींच्या आक्रोषाने उपस्थितांची मनं हेलावून गेली. दरम्यान, स्थानिक लोकांनी अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यानंतर दिल्ली-काठमांडू महामार्ग रोखत स्थानिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, लोकांची पोलिसांसोबतही मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. 

Web Title : राजमार्ग बना मौत का मार्ग: मोतिहारी में ट्रक ने पांच को कुचला

Web Summary : उत्तर प्रदेश के मोतिहारी में एक तेज रफ्तार ट्रक ने कई वाहनों को टक्कर मार दी, जिससे पांच लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। स्थानीय लोगों ने विरोध प्रदर्शन किया और दिल्ली-काठमांडू राजमार्ग पर इस दुखद दुर्घटना के लिए जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की।

Web Title : Highway Turns Death Trap: Truck Kills Five in Motihari Crash

Web Summary : A speeding truck in Motihari, Uttar Pradesh, collided with multiple vehicles, killing five and injuring others. Locals protested, demanding action against those responsible for the tragic accident on the Delhi-Kathmandu highway.