शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:17 IST

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर-झाशी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये फॉर्च्यूनर कारमधून प्रवास करणाऱ्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर-झाशी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये फॉर्च्यूनर कारमधून प्रवास करणाऱ्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ग्वाल्हेरमधील मालवा कॉलेजसमोर हा अपघात झाला. वेगाने येणारी फॉर्च्यूनर कार वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि सर्व तरुणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्यूनर ग्वाल्हेरकडे जात होती. महामार्गावर वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे जात होती. अचानक फॉर्च्यूनर मागून ट्रॉलीला धडकली. जास्त वजनामुळे ट्रॉली जास्त हलली नाही, मात्र वेगाने जाणाऱ्या कारचा चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज आला, त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि रुग्णवाहिका बोलावली.

भीषण अपघाताची माहिती मिळताच झाशी रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. कारचा चक्काचूर झाल्यामुळे कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. धडकेनंतर काही वेळातच पाचही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक पूर्ववत केली. अपघाताचे नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic Accident in Gwalior: Five Killed in Fortuner-Tractor Collision

Web Summary : A horrific accident on the Gwalior-Jhansi highway claimed five lives. A speeding Fortuner collided with a tractor-trolley near Malwa College, Gwalior. The impact was fatal, resulting in the immediate death of all five young occupants. Police are investigating the cause.
टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू