शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:44 IST

Gujarat News: मृतांमध्ये डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश.

Gujarat News: गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यात सोमवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने राज्याला हादरवून सोडले आहे. मोडासा येथील राणासैयद चौकाजवळ धावत्या अॅम्बुलन्सला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने पूर्ण वाहनाला वेढा दिला. या घटनेत चार जणांची होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. चालक आणि बालकाच्या एका नातेवाइकाला मात्र वेळेवर बाहेर काढल्याने ते बचावले.

उपचारासाठी नेत असताना आग

सविस्तर माहिती अशी की, ऑरेंज हॉस्पिटलची ही अॅम्बुलन्स एका दिवसाच्या नवजात बालकाला प्रसवानंतर पुढील उपचारांसाठी अहमदाबाद येथे घेऊन जात होती. मोडासा शहरातून जात असताना वाहनाच्या मागील बाजूला अचानक आग लागली. काही सेकंदांतच अॅम्बुलन्सच्या मागील बाजुला आगीने वेढले, ज्यामुळे डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. चालक आणि नातेवाईक मात्र पुढील बाजूने उडी मारुन बाहेर पडले.

स्थानिकांची धावपळ 

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मोडासा नगरपालिका अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने शर्तीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. स्थानिक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचा CCTV फुटेजही समोर आला आहे, ज्यात पेट्रोल पंपाजवळ धगधगत असलेली अॅम्बुलन्स स्पष्ट दिसते. मृतांमध्ये नर्स भाविकाबेन रमणभाई मनात (वय 22 वर्षे)  (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर) आणि डॉ. राज शांतिलाल रेंटिया (वय 35 वर्षे) – डॉक्टर (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर) यांच्यासह नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे.

आग लागण्यामागे तांत्रिक बिघाड? तपास सुरू

पोलीसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अॅम्बुलन्समध्ये झालेला शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाड हा आग लागण्याचे संभवित कारण मानले जात आहे. मात्र अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. मोडासा सारख्या शांत शहरात झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. स्थानिकांनी अॅम्बुलन्ससारख्या जीवनरक्षक सेवांच्या सुरक्षिततेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Ambulance Fire Kills Newborn, Doctor, Nurse, and Father

Web Summary : A horrific ambulance fire in Gujarat killed a newborn, doctor, nurse, and the baby's father. A technical fault is suspected as the cause. Driver and relative survived.
टॅग्स :GujaratगुजरातfireआगDeathमृत्यू