शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे सरकार नरमले, कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव, प्रजासत्ताकदिनी रॅली न काढण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:59 IST

मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार पडली. आजच्या चर्चेत सरकार एक पाऊल मागे घेताना दिसले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करू व शेतकऱ्यांची एक समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे ठेवला. शेतकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे.

विकास झाडे नवी दिल्ली :शेतकरी आणि मंत्रीगटाच्या बैठकीत सरकारवर कायद्यापेक्षा शेतकऱ्यांच्या रॅलीचे दडपण दिसून आले. मंत्र्यांनी रॅली काढू नका, अशी विनंती केली शिवाय दोन वर्षांसाठी कृषी कायदे स्थगित करू आणि शेतकऱ्यांची समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकरी नेत्यांना देण्यात आला आहे. शेतकरी यावर उद्या गुरुवारी उत्तर देणार आहेत.मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार पडली. आजच्या चर्चेत सरकार एक पाऊल मागे घेताना दिसले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करू व शेतकऱ्यांची एक समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे ठेवला. शेतकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. परंतु अशी कुठलीही रॅली काढू नका, अशी विनंती आजच्या बैठकीत कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केली. समितीवरील टीका अनाठायी; सुप्रीम काेर्टाने व्यक्त केली नाराजी -नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची बाजू ऐकण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या चार सदस्यांच्या समितीला कोणतेही न्यायिक अधिकार प्रदान केलेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे या समितीवर होणारी टीका अयोग्य आहे असेही काेर्टाने सुनावले.

या समितीतील एक सदस्य भूपिंदरसिंग मान यांनी राजीनामा दिल्याने त्यांची जागा भरण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका भारतीय किसान पार्टीने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली.

‘एनआयए लक्ष्य करीत आहे’ -प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढू नये यासाठी सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनीच निर्णय घ्यावा, असे कोर्टाने सांगितले. तर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) शेतकऱ्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप बैठकीत शेतकऱ्यांनी केला. 

सुरक्षा व्यवस्थेत वाढ! -- प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी राजपथावर घुसण्याचा प्रयत्न करू नये म्हणून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. शिवाय कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पंतप्रधान व गृहमंत्री आदींच्या निवासस्थानांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. - २६ जानेवारी रोजी तिकीट खरेदी करून वा पास घेऊन शेतकरी संचलनात अडथळा आणू शकणार नाहीत. अशा शेतकऱ्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस सामान्य लोकांमध्ये तैनात असतील. - रॅलीसाठी दिल्लीत वेगवेगळ्या सीमेवर शेतकऱ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. आज टिकरी सीमेवर एका शेतकऱ्याच्या हृदयविकाराने मृत्यू झाला.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीPunjabपंजाब