शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्ष पिकाला चांगला वाव : गायकवाड

By admin | Updated: September 18, 2016 00:20 IST

चर्चासत्र : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ

चर्चासत्र : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ नाशिक : देशभरात होणार्‍या द्राक्षाच्या उत्पादनापैकी केवळ १० टक्केच द्राक्षांची परदेशात निर्यात होते, तर नव्वद टक्के द्राक्षांची देशांतर्गत विक्री केली जाते़ शेतकरी निर्यातक्षम द्राक्षासाठी जशी मेहनत घेतात तशीच मेहनत देशांतर्गत विक्रीसाठीच्या द्राक्षासाठी घेतल्यास शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले़ दादासाहेब गायकवाड सभागृहात ऑक्टोबर छाटणी या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़गायकवाड म्हणाले की, परदेशात निर्यात करणारी द्राक्षांची गुणवत्ता ही चांगली असावी लागते़ अर्थात त्यासाठी काही देशांमध्ये चांगले वाण विकसित करण्यात आले असून, या वाणांची आयात करून आपणही निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करू शकतो़ तसेच परदेशात निर्यातीसाठी द्राक्षे कडक, गोड असणे गरजेचे असते़ शेतकर्‍यांनी द्राक्षांच्या उत्पादन घेताना प्रमाणित कंपन्यांच्याच किटकनाशकांचा वापर करणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी सहसंचालक कैलास मोते, कृषी अधिकारी टी़ एऩ जगताप, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, प्रकल्प संचालक अशोकराव कांबळे, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, आदि उपस्थित होते़ यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़या चर्चासत्राच्या उद्घाटनसत्रानंतर द्राक्षबागेतील रोग व्यवस्थापन, द्राक्षबागेतील विस्तार व मालाचे व्यवस्थापन, द्राक्षबागेतील कीड नियंत्रण, द्राक्षबागेतील जमीन, खत व्यवस्थापन व संजीवकांचा वापर या विषयांवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ़ एस़ डी़ सावंत, डॉ़ ए़ के़उपाध्याय, डॉ़ आऱ जी़ सोमकुवर, डॉ़ एस़ डी़ रामटेके, डॉ़ दीपेंद्र सिंग यादव आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)