शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसू

By admin | Updated: August 20, 2014 23:04 IST

पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी आज पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थानी आपल्या हजारो समर्थकांसह घुसण्याचा इशारा दिला,

इस्लामाबाद : पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी आज पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थानी आपल्या हजारो समर्थकांसह घुसण्याचा इशारा दिला, तर मौलवी ताहिर उल कादरी यांनी निदर्शकांना संसदेला घेराव घालण्यास सांगितले. दरम्यान, लष्कराने महत्त्वाच्या इमारतींचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असे म्हटले.
निदर्शकांच्या दबावामुळे नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांना भेटण्याचा निर्णय आज घेतला. शरीफ यांच्या सरकारच्या बरखास्तीची मागणी निदर्शक करीत आहेत. देशासाठी नवाज शरीफ इम्रान खान यांना 
भेटणार आहेत, असे शरीफ यांचे निकटवर्ती व रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफिक यांनी टि¦ट केले आहे. तथापि, त्यांनी भेटण्याचा दिवस सांगितलेला नाही.
इम्रान खान यांनी आक्रमक भूमिकाही सोडलेली नाही. त्यांनी टि¦टरवर म्हटले आहे की, आम्ही आज रात्री (बुधवारी) डी चौकात (रेड झोनमध्ये पार्लमेंट हाऊस, पंतप्रधानांचे व अध्यक्षांचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय व विविध देशांचे दूतावास आहेत) आझादी (स्वातंत्र्य) साजरी करणार आहोत. सर्व पाकिस्तानी नागरिकांनी येथे येऊन सगळे अडथळे तोडावेत, बेकायदेशीरपणो डांबून ठेवलेल्या लोकांना सोडून द्यावे, अन्यथा आम्ही शिक्षा करू, असा इशाराही खान यांनी पोलिसांना त्यात दिला आहे. खान यांच्या पक्षाने सरकारशी वाटाघाटी करण्याची तयारी दाखविली होती, असे उपाध्यक्ष शाह महेमूद कुरेशी यांनी ‘डॉन न्यूज’ला सांगितल्यानंतर खान यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, महत्त्वाच्या इमारतींचे पावित्र्य राखा, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले असल्याच्या पाश्र्वभूमीवर राजधानीतील पेचात लष्कर तर हस्तक्षेप करणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)
 
4इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करणा:या निदर्शनांविरुद्ध दाखल याचिकेवर सुनावणी करताना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि मौलवी ताहिर उल कादरी यांना बुधवारी समन्स बजावले. 
 
4लाहोर उच्च न्यायालयाच्या मुल्तान वकील संघाने ही याचिका दाखल केली आहे. खान व कादरी यांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून तसेच प्रवेश निषिद्ध भागात प्रवेश करण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेहरिक ए इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तहरिकचे प्रमुख कादरी यांना नोटिसा बजावत सुनावणी उद्यार्पयत तहकूब केली. 
 
मौलवी ताहिर ऊल कादरी आणि इम्रान खान यांनी इस्लामाबादेत बुधवारी आपल्या समर्थकांसह नवाज शरीफ सरकारच्या हकालपट्टीसाठी निदर्शने केली. दंगल नियंत्रित करणा:या पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता.