शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 06:00 IST

Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांचा संसदेवर धडक देण्याचा ट्रॅक्टर मोर्चा रद्द

- विकास झाडे नवी दिल्ली : संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर ही एमएसपीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. संंयुक्त किसान मोर्चाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर मार्च ६ डिसेंबरपर्यंत ढकलण्यात आला.   वीजबिल आणि पराळी जाळण्याचा दंडही रद्द करावा.  शहीद शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, देशभर शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत.   लखीमपूर खेरी घटनेतील दोषीला मंत्रिमंडळातून  बडतर्फ करावे.  एमएसपीचा मुद्दा त्वरित सोडवावा, असे म्हटले आहे.

आम्ही आघाडी जिंकली, आज सरकारकडून काही निवेदने आली आहेत, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आम्ही वाट पाहत आहोत. २९ तारखेला संसदेवर मोर्चा काढणार नाही. सरकारला आमच्याशी चर्चा करावी  लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सोडला  सुटकेचा नि:श्वाससोमवारी संसदेकडे जाणारा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वास्तविक, संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आंदोलकांचा ट्रॅक्टर मोर्चा रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPoliticsराजकारण