शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 4:44 AM

Farmer Protest News Update : पंजाब अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असा सावधगिरीचा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला दिला.

चंदीगड :  नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हापासून पाकिस्तानातून भारतात शस्त्रास्त्रे व अमली पदार्थांच्या तस्करीतही वाढ झाली आहे. पंजाब अशांत करण्याचा  पाकिस्तानचा डाव आहे, असा सावधगिरीचा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला दिला.अमरिंदरसिंग म्हणाले, ‘पाकिस्तानातून सध्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तस्करीमागे काही कारस्थान असण्याची शक्यता आहे. त्याची केंद्र सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे. पाकिस्तान पंजाबमध्ये विविध प्रकारांनी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. याबद्दल अनेक दिवसांपासून मी केंद्र सरकारला सातत्याने माहिती कळवत आहे. पाकिस्तानचे भारतामध्ये स्लीपर सेल असून, त्यांच्या मदतीने पंजाबमध्ये अशांतता पसरविण्याचा उद्योग केला जात आहे.’  ते म्हणाले की, पंजाबच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तान आहे तर उत्तर सीमेवर चीन आहे.  तस्करीसाठी ड्रोनचा वापर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग म्हणाले, पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी केली जाते. ही सारी माहिती देण्यासाठी मी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो होतो. भारतीय सुरक्षा जवानांनी पाकिस्तानमधून पंजाबमध्ये आलेले ३० ड्रोन पकडले; पण न पकडल्या गेलेल्या ड्रोनची संख्याही २०-३०च्या आसपास आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबDrugsअमली पदार्थ