शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक घोषित

By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST

* ६ जानेवारीला उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत* २४ जानेवारीला मतदान व २५ ला मतमोजणी(लोगो)२११२२०१४-आयसीएच-०२इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ जानेवारी २०१५ असून, मतदान २४ जानेवारीला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था विभागीय उपनिबंधक डॉ. ...


* ६ जानेवारीला उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत
* २४ जानेवारीला मतदान व २५ ला मतमोजणी
(लोगो)
२११२२०१४-आयसीएच-०२
इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ जानेवारी २०१५ असून, मतदान २४ जानेवारीला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी आज, रविवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, संचालकांच्या १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
पंचगंगा सहकारी साखर कारखाना हा जिल्‘ातील सर्वांत जुना सहकारी क्षेत्रातील साखर कारखाना आहे. स्थापनेपासून हा कारखाना संस्थापक अध्यक्ष रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अधिपत्याखाली राहिला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी काही काळ या कारखान्याच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला. सध्या पी. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ कारखान्याचे कामकाज चालवीत आहे. तसेच हा कारखाना रेणुका शुगर्स या खासगी संस्थेकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे.
कारखान्याचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्‘ातील हातकणंगले, शिरोळ व करवीर या तीन तालुक्यांत असून, बेळगाव (कर्नाटक) जिल्‘ातील चिकोडी तालुक्यातसुद्धा कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे या कारखान्यास बहुराज्य अधिनियम लागू असून, त्यानुसार कारखान्यावर उत्पादक सभासदांतून बारा, तर अनुत्पादक सभासदांतून दोन असे चौदा संचालक निवडून दिले जातात. अनुत्पादक सभासदांमध्ये संस्था व व्यक्ती असे दोन गट आहेत. उत्पादक सभासदांची संख्या सुमारे २४ हजार, तर अनुत्पादक सभासदांची संख्या एक हजार आहे.
पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर ते ५ जानेवारी अशी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्जांची छाननी ६ जानेवारीला होणार असून, त्याचदिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. उमेदवारी माघार घेण्यासाठी १२ जानेवारीची मुदत असून, १३ जानेवारीला चिन्ह वाटप होणार आहे. बहुराज्य कायद्यानुसार निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांची घोषणा १४ जानेवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. निवडून देण्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असतील तर याच सभेत मतदान दिनांक व स्थळ जाहीर करण्यात येईल. मतदान २४ जानेवारीला व मतमोजणी २५ जानेवारीला होणार आहे. (प्रतिनिधी)
चौकट
मगदूम गट शांत; मात्र नवीन गटाचा उदय
पंचगंगा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रत्नाप्पाण्णा कुंभार हयात असताना कुंभार गटातच दुफळी पडल्याने त्यावेळी कुंभार व यड्रावकर असे ध्रुवीकरण झाले होते. तेव्हा पंचगंगा साखर कारखान्याच्या झालेल्या दोन निवडणुकांमध्ये प्रचंड रणधुमाळी माजली होती. कुंभार यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये रजनीताई मगदूम व पी. एम. पाटील अशा दोन गटांत झालेल्या निवडणुकीत पाटील यांनी निर्विवाद बहुमत मिळविले. सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी मगदूम गट अद्यापही शांत आहे; पण बी. डी. पाटील या नवीनच गटाने उचल खाल्ली असून, त्यांनी विद्यमान अध्यक्ष पाटील गटाच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.