शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी-मुलाचा कारनामा! 'मी जिवंत आहे...' म्हणत 'तो' पुरावा घेऊन एसपी ऑफिसमध्ये पोहचला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:23 IST

एका व्यक्तीने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं. या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाने त्याला मृत घोषित करून त्याचं खोटं मृत्यूपत्र बनवलं आणि सर्व संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, चंकसेरिया येथील रहिवासी असलेल्य़ा सुरेंद्र यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. त्यांच्या पत्नीने सर्व जमीन मुलाच्या आणि स्वत:च्या नावावर करून घेतली आहे. 
 
जिवंत असलेल्या पतीला मृत घोषित करून संपत्ती हडपणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेव्हा नवऱ्याला हा सर्व धक्कादायक प्रकार समजला तेव्हा त्याने न्यायासाठी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आता तो न्याय मागत असून जिवंत असल्याचं सर्वांना सांगत आहे. सुरेंद्रने एसपी कार्यालयात पोहचून अधिकाऱ्यासमोर हजर होत आपण जिवंत असल्याचा पुरावा दिला. 

अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच पोलिसांना आता सुरेंद्र यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची देखील व्यवस्था केली आहे. सुरेंद्र यांनी पत्नीचं गावातील एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यानेच आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचं देखील म्हटलं आहे. पत्नी मारहाण देखील करायची. जेवायला द्यायची नाही असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी