शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पंपांवर ई-वॉलेट्स धोक्याचे

By admin | Updated: December 26, 2016 01:18 IST

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर पेट्रोल पंपांवर कॅशलेस व्यवहारासाठी डेबिट कार्ड व मोबाइल, ई-वॉलेटचा वापर करण्याचा सरकारचा जोरदार आग्रह असला तरी

हैदराबाद : चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द  केल्यानंतर पेट्रोल पंपांवर  कॅशलेस व्यवहारासाठी डेबिट कार्ड व मोबाइल, ई-वॉलेटचा वापर करण्याचा सरकारचा जोरदार आग्रह असला तरी कार्ड स्वाइप करताना तुम्ही अत्यंत धोका स्वीकारत आहात एवढे लक्षात असू द्या. पेट्रोल पंपांवर मोबाइल फोन वापरणे धोक्याचे असून, तशा सूचनाही तेथे ठळकपणे लिहिलेल्या असतात. त्यामुळे मोबाइल वा ई-वॉलेटचा कॅशलेस व्यवहारांसाठी वापर करण्याच्या सरकारच्या आग्रहाची समाजमाध्यमांतून जोरदार थट्टा केली जात आहे. पेट्रोल पंप हे ‘नो मोबाइल झोन्स’ जाहीर असताना आता मात्र ते कॅशलेस व्यवहारांसाठी गर्दीचे ठिकाण बनले आहे व तेथे लाखो रुपयांचे व्यवहार रोज होत आहेत. पेट्रोल पंपांवर नोटाबंदीच्या निर्णयानंतर पीओएस, मोबाइल व ई-वॉलेट्सचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असल्यामुळे त्यांचा तेथील वापर बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहनही त्यात करण्यात आले आहे.मोबाइल वापरण्यावर आहेत कठोर निर्बंध स्फोटके, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या मुख्य नियंत्रकांनी पेट्रोलियम मंत्रालय आणि नैसर्गिक वायू महामंडळाला पाठविलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, १९ डिसेंबरच्या आमच्या आदेशात स्पष्टपणे असे म्हटले आहे की वाहनांत इंधन भरताना पेट्रोल पंपांवर पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशीन, मोबाइल, ई-वॉलेट्सचा वापर करण्यावर कठोर निर्बंध आहेत आणि पेट्रोल पंपांवर धोकादायक भाग (झोन -१) स्पष्टपणे दाखविण्याचा आदेश दिला आहे.झोन-वन असा निश्चित करण्यात आला आहे. तो १.२ मीटर्स तळापासून वर उभा व सर्व दिशांनी ४५ सेंटिमीटर्स पसरलेला असावा. ही बाब नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीचे माजी उपाध्यक्ष एम. शशिधर रेड्डी यांनी २४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ सचिवांच्या लक्षात आणून दिली.