शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू

By admin | Updated: December 29, 2015 23:51 IST

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.
मयत गोपालचेे वडीलही वाळू भरण्याचे काम करायचे. त्या वेळेस मजुरी कमी होती. पण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना हे अवजड काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. १५ वर्षांपूर्वी म्हणजेच गोपाल हा सात वर्षांचा असताना संतोष नन्नवरे हे खेडी खुर्दनजीकच्या गिरणा नदीत वाळू भरण्यासाठी गेले होते. वाळू वाहतुकीमुळे नदीत खोल खड्डे पडले होते. या खड्ड्यात काम करताना संतोष यांच्या अंगावर वाळूचा ढिगारा पडला होता. त्यात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता गोपालचाही वाळूमुळे मृत्यू झाला.

घरात एकटा, तीन बहिणी, पत्नी गर्भवती
मयत गोपालचे लग्न एप्रिल २०१५ मध्ये झाले होते. त्याची पत्नी गर्भवती आहे. तो घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी, पत्नी असा परिवार आहे. एका बहिणीचे लग्न झालेे आहे. शिकण्याच्या वयातच त्याने कुटुंबासाठी रोजगार पत्करला. गोपालचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घराचा मोठा आधार हरपला आहे.