इंदूर : मॅगीसारख्या इन्स्टंट फूडच्या वाढत्या प्रचलनासाठी आयांचा ‘आळस’ जबाबदार असल्याचे सांगून मध्य प्रदेशातील इंदूरच्या आमदार उषा ठाकूर यांनी रविवारी नाहक वाद ओढवून घेतला. माहिती नाही का, पण आजच्या आया चांगल्याच आळशी झाल्या आहेत. आम्ही तर आमच्या लहानपणी आमच्या आईच्या हातचा पराठा, शेवया, शिरा खाऊन मोठे झालोत. हे पदार्थ सुरक्षित आणि पौष्टिक होते, असे उषा ठाकूर म्हणाल्या.त्यांच्या या विधानावर प्रदेश काँग्रेसने जोरदार टीका केली. ठाकूर यांनी भारतीय मातांना आळशी म्हणून त्यांचा अपमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी, असे प्रदेश महिला काँग्रेसने म्हटले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}