शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बंदी उठल्यामुळे लाखोंची उलाढाल होणार

By admin | Updated: January 22, 2015 00:12 IST

- आंबा बागायतदार सुखावले

- आंबा बागायतदार सुखावले- यंदा १५ ते २0 मेट्रिक टन निर्यातीची अपेक्षारत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी कोकणातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा केली जात आहे. आतापर्यंत २00८-0९ यावर्षी रत्नागिरी जिल्‘ातून सर्वाधिक ८४ मेट्रिक टन आंबा युरोपीय देशात निर्यात झाला होता. यावर्षी तो किमान १५ ते २0 मेट्रिक टन होण्याची अपेक्षा असून, त्यातून लाखोंची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.भारतातून पाठविल्या गेलेल्या आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी भारतातून आंबा आणण्यावर बंदी आणण्यात आली होती. फळबागांवरील कीड व रोग प्रतिबंधाचे प्रभावी उपाय योजण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळेच येत्या हंगामातील आंबा युरोपीय देशांनी ही बंदी उठविली आहे.युरोप, अमेरिका व जपान येथे निर्यात सुरू झाल्यापासून आंबा उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडली आहे. युरोपीय देशांच्या हवामानानुसार गॅप प्रमाणपत्र निश्चित करण्यात आले आहे. निर्यातीसाठी त्याची आवश्यकता आहे. अमेरिकेला आंबा पाठवीत असताना गॅमा (विकिरण) प्रक्रिया आवश्यक आहे. सध्या लासलगाव (नाशिक) येथे ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने अधिकच्या अंतरामुळे वाहतूक खर्च परवडत नसल्याने वाशी (नवी मुंबई) येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.अरब राष्ट्र तसेच सिंगापूर, मलेशिया येथे आंबा निर्यातीसाठी त्रास होत नाही; मात्र अमेरिका, जपान व युरोपीय देशांमध्ये आंबा पाठविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गतवर्षी युरोपीय देशांनी आंबा नाकारल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड बसला होता. त्यामुळे आंब्याचे दरही कोसळले होते.भारतातून सन २०११-१२ मध्ये एकूण ६६,४४१ मेट्रिक टन आंबा परदेशात निर्यात करण्यात आला होता. त्यापैकी २५३२ मेट्रिक टन युरोपीय देशात पाठविण्यात आला होता. तसेच २०१२-१३ मध्ये एकूण ५५,४१३ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यापैकी ३,८९० मेट्रिक आंबा युरोपीय देशात पाठविण्यात आला होता. २०१३-१४ मध्ये आयात बंदीमुळे युरोपीय देशात आंबा गेलाच नाही.रत्नागिरीतून निर्यात झालेला आंबा२००५-०६ मध्ये ९.५ मेट्रिक टन, २००६-०७ परदेशी पाठविण्यात आलेला नाही, २००७-०८ मध्ये ४०.८२, २००८-०९ मध्ये- ८४.५२, २०१०-११ - ११.०९ , २०११-१२ ला १६.८, २०१२-१३ ला १८ मेट्रिक टन आंबा परदेशी पाठविण्यात आला होता. यंदा सद्य:स्थितीत मोहराचे प्रमाण चांगले असल्याने आणि आयात बंदी उठल्यामुळे यंदा १५ ते २0 मेट्रिक टन इतकी आंबा निर्यात अपेक्षित धरली जात आहे. (प्रतिनिधी)