ड्रॅगनचं भारतीयांना 'सरप्राइज'! चीननं तिबेटसंदर्भात घेतला मोठा निर्णय, जूनपासून होणार लोगू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:30 IST2026-03-22T14:29:29+5:302026-03-22T14:30:51+5:30

दरम्यान या पार्श्वभूमीर, पिथौरागडचे जिल्हाधिकारी आशीष भटगांई यांनी संबंधित विभागांना सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बीएसएनएलला सीमा क्षेत्रात नेटवर्क आणि संचार व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे.

Dragon's 'surprise' for Indians! China takes big decision regarding Tibet, logo will be launched from June | ड्रॅगनचं भारतीयांना 'सरप्राइज'! चीननं तिबेटसंदर्भात घेतला मोठा निर्णय, जूनपासून होणार लोगू

ड्रॅगनचं भारतीयांना 'सरप्राइज'! चीननं तिबेटसंदर्भात घेतला मोठा निर्णय, जूनपासून होणार लोगू


चीननेभारतीय व्यापाऱ्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. आपल्या अधिपत्याखालील तिबेट भागातील तकलाकोट येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, चीननेभारतीय व्यापाऱ्यांसाठी पक्की दुकाने तयार केली आहेत. यामुळे, आता भारतीय व्यापाऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच अशा पक्क्या आणि सुसज्ज दुकानांमध्ये बसून व्यापार करण्याची संधी मिळेल. सीमावर्ती भागातील स्थानिक व्यापाऱ्यांना चीनच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.

यासंदर्भात पिथौरागड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार, जून महिन्यापासून भारतीय व्यापाऱ्यांना ही दुकाने दिली जाण्याची शक्यता आहे. पिथौरागड जिल्हा मुख्यालयापासून ३०० किमी अंतरावर असलेल्या या सीमावर्ती भागात अनेक वर्षांपासून व्यापार चालत आला आहे. मात्र आता तेथील सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना भारत-चीन व्यापार समितीचे महासचिव दौलत रायपा म्हणाले, २०१९ पर्यंत जेव्हा व्यापार सुरू होता, तेव्हा भारतीय व्यापाऱ्यांसाठी येथे पक्की दुकाने नव्हती. ते नेपाळी व्यापाऱ्यांच्या सोबतीने तात्पुरत्या स्वरूपाच्या दुकानांद्वारे व्यापार करत असत. मात्र, आता तकलाकोटमध्ये सर्व व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र पक्की दुकाने उभारली जात आहेत.

जिल्हा प्रशासनही तयार - 
दरम्यान या पार्श्वभूमीर, पिथौरागडचे जिल्हाधिकारी आशीष भटगांई यांनी संबंधित विभागांना सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बीएसएनएलला सीमा क्षेत्रात नेटवर्क आणि संचार व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे. गुंजी येथे शौचालये आणि पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी जिल्हा पंचायत आणि पर्यटन विभाग सक्रिय झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच व्यापार सुरळीत करण्यावर प्रशासनाचा मुख्य भर आहे.

तकलाकोटचे महत्त्व -
लिपुलेख खिंडीजवळील तकलाकोट हे उत्तराखंडसाठी एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येथे प्रामुख्याने उनी कपडे, मीठ, तूप यांसारख्या वस्तूंचा व्यापार चालतो. चीनच्या या नवीन उपक्रमामुळे सीमा व्यापाराला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. कोरोना काळापासून तकलाकोटमध्ये भारत आणि चीनमधील व्यापार बंद होता. शेवटचा व्यापार २०१९ मध्ये झाला होता. आता तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा व्यापार सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Web Title : चीन का सरप्राइज: तिब्बत में भारतीय व्यापारियों के लिए नया व्यापार ढांचा

Web Summary : चीन तिब्बत के तकलाकोट में सीमा पार वाणिज्य को बढ़ावा देने के लिए भारतीय व्यापारियों को स्थायी दुकानें प्रदान कर रहा है। जून में शुरू होने की उम्मीद है, इस पहल का उद्देश्य ऊन और नमक जैसे सामानों के व्यापार को पुनर्जीवित करना और स्थानीय अर्थव्यवस्था को मजबूत करना है।

Web Title : China's Surprise: New Trade Infrastructure for Indian Traders in Tibet

Web Summary : China is providing Indian traders with permanent shops in Tibet's Taklakot to boost cross-border commerce. Expected to start in June, this initiative, after a six-year halt, aims to revitalize trade of goods like wool and salt, strengthening the local economy.