शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:06 IST

मोदी यांच्या हस्ते सुमारे ३४,२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले

भावनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जनतेला स्वयंपूर्णतेची हाक दिली. इतर देशांवर असलेले आपले परावलंबित्व हाच देशाचा खरा शत्रू असल्याचे ते म्हणाले. सेमीकंडक्टरपासून जहाजापर्यंत प्रत्येक वस्तू स्वदेशात उत्पादित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भावनगरच्या गांधी मैदानात आयोजित ‘समुद्रापासून समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. विश्व बंधुत्वाच्या भावनेने भारत वाटचाल करीत असल्याचे सांगून जगात भारताचा कुणीच शत्रू नाही; परंतु, इतर देशांवर असलेले अवलंबित्व हाच मुख्य शत्रू असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोदी यांच्या हस्ते सुमारे ३४,२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. यातील ७,८७० कोटी रुपयांच्या योजना सागरी क्षेत्राशी संबंधित आहेत.

मुंबईतील अत्याधुनिक क्रूझ टर्मिनलचे उद्घाटनपंतप्रधान मोदी यांनी शनिवारी गुजरात दौऱ्यादरम्यान आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सागरी पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी उभारलेल्या अत्याधुनिक अशा मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे व्हर्चुअली उद्घाटन केले.  हे देशातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. भारतीय क्रूझ पर्यटनाचे ‘गेटवे’ म्हणून ते ओळखले जाईल. रोज १० हजार प्रवासी थांबवण्याची व्यवस्था येथे असेल. शिवाय, ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटरच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा मिळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत