शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Riots: पोलिसांच्या आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांच्यासह बड्या नावांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 23:02 IST

Delhi Riots: आंदोलकांना कोणत्याही थराला जाण्याची चिथावणी दिल्याचा ठपका

नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र तयार केलं आहे. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कार्यकर्ते अपूर्वानंद आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर राहुल रॉय यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. कटकारस्थानासह सहाय्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरी नक्षलवादाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.कोणत्याही थराला जा, अशी चिथावणी आरोपींनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना दिली होती. आरोपींनी सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मुस्लिमविरोधी असल्याचं सांगत आरोपींनी आंदोलनकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण केली. त्यांनी भारत सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी आंदोलनांचं आयोजन केलं, असा तपशील पुरवणी आरोपपत्रात आहे.जेएनयू आणि जामियाचे विद्यार्थीदेखील आरोपीदिल्लीच्या ईशान्य भागात २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला. तर ५८१ जण जखमी झाले. यातील ९७ जण गोळीबारात जखमी झाले, अशी माहिती पुरवणी आरोपपत्रात आहे. तीन विद्यार्थ्यांनी दिलेल्या जबाबांवरून पोलिसांनी प्रख्यात नेत्यांवर आरोप ठेवले आहेत. जेएनयूच्या विद्यार्थिनी देवांगना कालिता, नताशा नरवाल आणि जामिया मिलिया इस्लामियाची विद्यार्थिनी गुलफिशा फातिमा 'पिंजरा तोड'च्याही सदस्या आहेत. जाफराबाद हिंसाचार प्रकरणात त्या आरोपी आहेत. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवjnu - jawaharlal nehru universityजेएनयू