शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये कधी मिळणार? रेखा गुप्ता यांनी सांगितली तारीख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:23 IST

भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

नवी दिल्ली : रेखा गुप्ता यांनी गुरुवारी (दि.२०) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून रेखा गुप्ता आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी काल झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती.

भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याबद्दल रेखा गुप्ता यांनी शपथविधीपूर्वी स्पष्टपणे सांगितले की, भाजप आपले आश्वासन पूर्ण करेल. भाजप सरकार महिलांना दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे आपले आश्वासन पूर्ण करणार आहे. आर्थिक मदतीचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात ८ मार्चपर्यंत जमा होईल. 

रेखा गुप्ता म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी दिल्लीतील सर्व ४८ भाजप आमदारांची आहे. महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे निश्चितपणे हस्तांतरित केले जातील." 

दरम्यान, दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप सरकार महिलांना आर्थिक मदत करून आपले निवडणुकीत आश्वासन पूर्ण करण्याचा विचार करत आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. यात भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. 

भाजपने कोणती आश्वासने दिली?आपने विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी दरमहा २,१०० रुपये मदत करण्याचे जाहीर केले होते. तर, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दरमहा २५०० रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, गेल्या बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांनी सांगितले की, दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाWomenमहिला