शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:05 IST

लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक भयानक तपशील आहेत

नवी दिल्ली - दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याठिकाणी असलेल्या लोकांच्या चिंधड्या उडाल्या. ज्यानेही हे दृश्य पाहिले त्यांच्या अंगाचा थरकाप झालेला दिसून आला. आता त्याहून अधिक भयानक असं या मृतदेहांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक भयानक तपशील आहेत. अनेक मृतदेहांची हाडे तुटली आणि डोक्याला दुखापत झाली. याव्यतिरिक्त काही मृतदेहांमध्ये स्फोटामुळे फुफ्फुसे, कान आणि पोटाला नुकसान झाल्याच्या खुणा दिसून आल्या. स्फोटात मृतांचे कानाचे पडदे, फुफ्फुसे आणि आतडे फुटले, ज्यामुळे स्फोट अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते.

स्फोटानंतर लोक भिंतींवर आणि जमिनीवर आदळले

स्फोटाच्या गंभीर दुखापती आणि जास्त रक्तस्त्राव यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. शिवाय क्रॉस-इंजरी पॅटर्न पाहण्यात आला, जिथे स्फोटाच्या धक्क्याने लोक भिंतींवर आणि जमिनीवर आदळले. शवविच्छेदन अहवालात मृतदेहांवर आणि कपड्यांवर स्प्लिंटर्सचे कोणतेही निशान आढळले नाहीत, परंतु स्फोटात सुधारित स्फोटक पदार्थ वापरला गेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सध्या या स्फोटात कुठले रासायनिक केमिकल वापरले होते याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.. शिवाय बहुतेक मृतदेहांवर जखमा शरीराच्या वरच्या भागात, डोक्यात आणि छातीत केंद्रित होत्या.

दरम्यान, दिल्ली स्फोटात वापरल्या गेलेल्या आय २० कारबद्दल काही अफवा पसरत असल्याचे फरीदाबाद पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ही कार १०-११ दिवसांपासून अल-फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होती. हे खरे नाही. फरीदाबाद पोलीस याची पुष्टी करत नाहीत आणि या अफवेचे पूर्णपणे खंडन करतात असं सांगण्यात येत आहे. 

दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...

मुजम्मिलने पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत मोठ्या घातपात करण्याचा कट आखला होता. या कटात लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याचा डाव होता. एवढेच नाही तर, आपण सुरुवातीला दिवाळीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचे ठरवले होते, मात्र नंतर, तो प्लॅन पुढे ढकलला आणि २६ जानेवारीला हल्ला करण्याचे ठरवले, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले असं सूत्रांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Postmortem reveals shattered bones, torn organs, horror.

Web Summary : Delhi blast victims suffered horrific injuries: broken bones, lung and intestinal damage. Explosions threw victims against walls. A planned larger attack for Republic Day was foiled. Chemical analysis is ongoing.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला